Nanded Crime : वसुलीसाठी कर्जदारांचे अपहरण करून कार्यालयात डांबले

नांदेडमध्ये सावकारी दहशत; पाच जणांना बेड्या
kidnapping for loan recovery
सावकारी करणाऱ्या आरोपीसह (खाली बसलेले) पोलिस पथक.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : कर्जाचे पैसे थकल्याच्या कारणावरून दोन नागरिकांना जबरदस्तीने उचलून नेत, त्यांना कार्यालयात डांबून ठेवून अमानुष मारहाण करणाऱ्या व अवैध सावकारीचा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. शहरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात सुरू असलेल्या या अवैध सावकारी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीरबुऱ्हाण येथील आबेद अली चाऊस आणि अर्धापूर येथील समाधान जोंधळे यांनी फायनान्सचे पैसे थकवले होते. याचा राग धरून आरोपींनी 28 मार्च रोजी या दोघांनाही त्यांच्या परिसरातून बळजबरीने दुचाकीवर बसवून साठे चौकातील मखालसा फायनान्स गुरुकृपा ट्रेडर्सफच्या कार्यालयात आणले. तिथे त्यांना बेदम मारहाण करून डांबून ठेवण्यात आले. पैसे वसुलीसाठी या नागरिकांचा छळ करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

kidnapping for loan recovery
Wardha Crime : डिझेल, पेट्रोलची अवैध वाहतूक, पाच लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने गुन्हेगारांचा शोध घेत असताना, पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाला या प्रकरणातील आरोपी साठे चौकात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून खालसा फायनान्सच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पाच जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

पोलिसांनी मजहरखान नवीदखान (रा. नुरी चौक), अभिजीत प्रकाश सूर्यवंशी (रा. विष्णूनगर), ?सुमित रामदास ढवळे (रा. संघसेननगर), ?अभय गौतम भुजबळ (रा. गौतमनगर), ?अनिकेत राजू हिरापुरम (रा. नारायणनगर) या आरोपींना अटक केली.

kidnapping for loan recovery
Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या

दरम्यान बेकायदेशीर सावकारी किंवा कर्जवसुलीसाठी कोणी त्रास देत असेल तर नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मालकासह पाच जण फरार

या टोळीचा मुख्य सूत्रधार आणि फायनान्सचा मालक मॉन्टीसिंग मेजर, सोहेल खान, सय्यद आजम, शुभम कांबळे आणि एक विधिसंघर्षग््रास्त बालक हे सध्या फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या पाचही आरोपींना पुढील कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सावकारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत धक्कादायक कबुली दिली आहे. त्यांनी मालक मॉन्टीसिंग मेजर याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे मान्य केले. या प्रकरणी अर्धापूर आणि भाग्यनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम व भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news