विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर

परभणीत महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण; यॅलेसेमिया मुक्तीची शपथ
Meghna Bordikar
विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर File Photo
Published on
Updated on

Comprehensive Development of the District Through Various Schemes: Guardian Minister Bordikar

परभणी, पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात ठोस बदल घडवले जात आहेत. सौर ऊर्जा उपक्रम, शेतपाणंद योजना आणि डिजिटल सेवा यांसारख्या उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे, असे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या.

Meghna Bordikar
MLA Suresh Dhas : विकासासाठी गट-तट विसरून कामाला लागा

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडीयमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा लता वाकळे, महापौर स. इकबाल, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, देशातील डिजिटल जनगणना प्रक्रियेस सुरुवात झाली असून १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना सुरू आहे. यात उत्स्फूर्त सहभागी होऊन नागरिकांनी जनगणना पोर्टलवर अचूक माहिती भरावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासह जूनमध्ये होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. बालविवाहसारख्या कुप्रथांविरुद्ध जागरूक राहून १०९८ या क्रमांकावर माहिती देण्याचेही सांगितले. शेवटी थैलेसेमियामुक्त महाराष्ट्रसाठी पालकमंत्री यांनी उपस्थितांना शपथ दिली.

Meghna Bordikar
MLA Suresh Dhas : विकासासाठी गट-तट विसरून कामाला लागा

प्रारंभी पालकमंत्री बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन मानवंदना स्वीकारली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिकांची भेट घेतली. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडुंना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव झाला. सूत्रसंचालन सहशिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.

जिल्हा परिषदेत अध्यक्षा लता वाकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

परभणी : जिल्हा परिषदेमध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन देशभक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. जि.प. अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, उपाध्यक्ष श्रीकांत भोसले, महिला व बालकल्याण सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण सभापती पार्वतीबाई प्रल्हाद मुंढे, गटनेते दिलीपराव देशमुख, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ. संदीप घोन्सीकर, जि.प. सदस्या दीपाली चौधरी, बेबीताई कुकर, प्रतीक्षा जयस्वाल, विविध विभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि महिला-बालकल्याण क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

बोरी ग्रा.पं. त सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण

बोरी : महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायतीने एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबवत समाजासमोर आदर्श निर्माण केला. ग्रा.पं. कार्यालयात अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून प्रामाणिक सेवा बजावणारे शंकरराव वाकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सामान्यतः मान्यवर व्यक्तींच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात यंदा ग्रामपंचायतीने बदल करत दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचा सन्मान केला. या उपक्रमामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी यावेळी वाकोडे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाची दखल घेत अशा उपक्रमांची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news