Sambhajinagar News : कन्नड नगरपरिषदेकडून उघड्यावर मृत डुकरांची विल्हेवाट

डम्पिंग ग्राउंडवर कुजल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Kannad municipal council sanitation
मृतावस्थेत आढळलेली डुकरे व कुत्रे ही डम्पिंग ग्राउंडवर उघड्यावर तर काही पाण्यात आणून टाकल्याने ती कुजून सडली आहे.pudhari photo
Published on
Updated on

कन्नड : नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील विविध भागांत मृतावस्थेत आढळलेली डुकरे व कुत्रे ही डम्पिंग ग्राउंडवर उघड्यावर तर काही पाण्यात आणून टाकल्याने ती कुजून सडत असल्याने डोणगाव, शिवराई, बहिरगाव, मालपूर, बनशेंद्रा, पाणपोई नागरिकांच्या परिसरातील आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात मृत पडलेली डुकरे नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून डम्पिंग ग्राउंडवर नेऊन उघड्यावरच टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी त्यांना उघड्यावर फेकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Kannad municipal council sanitation
Chhatrapati Sambhajinagar externment : सरपंच मंगेश साबळे यांना तडीपारीची नोटीस

यातच रविवारी दुपारी या मृत डुकरांना डम्पिंग ग्राउंडवरच जाळण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. मृत जनावरांच्या जाळण्यामुळे धूर व दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. या ठिकाणी भटक्या प्राण्यांचा वावर वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नगर परिषदेने तातडीने मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, डम्पिंग ग्राउंडची स्वच्छता करावी तसेच संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झाल्याने तसेच परिसरातील लोकांकाडून संताप व्यक्त होत असल्याने नगर परिषद प्रशासन खडबडून जागे होऊन मृत जनावरे जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून पुरण्यात आली.

Kannad municipal council sanitation
Maratha reservation protest : प्रकृती खालावली तरीही दाते पाटील उपोषणावर ठाम

कन्नड शहरातून नगरपरिषदकडून दोन ट्रॅक्टर मृत झालेले डुकरे व कुत्रे येथील डम्पिंग ग्राउंडवर आणून टाकली होती. ती कुजून सडत असल्याने मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली. आजूबाजूच्या गावांतील लोकांच्या आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता असून मी याबाबत मुख्याधिकारी यांना कॉल केले मात्र त्यांनी ते घेतले नाही. काही डुकरे पाण्यात फेकली असल्याने पाण्यातूनसुद्धा दुर्गंधी सुटली आहे.

संदीप गायके ग्रा. पं. सदस्य, डोणगाव -विठ्ठलपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news