Maratha reservation protest : प्रकृती खालावली तरीही दाते पाटील उपोषणावर ठाम

नवव्या दिवशीही प्रशासनाकडून दुर्लक्ष; मराठा समाजात संताप
Maratha reservation protest
राजेंद्र दाते पाटील यांच्या उपोषणस्थळी उपस्थित पदाधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयासमोर ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी (दि.१७) नववा दिवस होता. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून अशक्तपणा वाढला आहे. शुगरची पातळी कमी झाल्याने त्यांना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका दाते पाटील यांनी घेतली आहे.

दाते पाटील यांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. उपोषणाला नऊ दिवस उलटूनही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Maratha reservation protest
Sambhajinagar voter list SIR : जिल्ह्यात ६.१२ लाख मतदार यादीतून वगळणार

दरम्यान, शनिवार, रविवार नंतर सोमवारीही दिवसभर विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देत दाते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने मराठा समाजात चिंता व्यक्त होत आहे. पाटील यांच्या प्रकृतीबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल घेऊन चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी समाजातून होत आहे. दरम्यान, पाटील यांच्या प्रकृतीला काही गंभीर धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यास समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यताही मोर्चाने व्यक्त केली आहे. उपोषणस्थळी प्रा. माणिकराव शिंदे, लक्ष्मण शिरसाठ, रवींद्र वाहटूळे, निखिल काकडे, रेखा वाहटूळे, सुनिल कोटकर, योगेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी व आंदोलक उपस्थित होते.

Maratha reservation protest
Manoj Jarange : कुणबी नोंदी कमी केल्यास सरकार पाडणार

दाते पाटलांच्या प्रमुख मागण्या

  • हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राबाबत भूमिका स्पष्ट करावी.

  • एसईबीसीला ओबीसीप्रमाणे सुविधा द्याव्यात.

  • मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत.

  • सारथी संस्थेला पाच हजार कोटींचा निधी द्यावा.

  • स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटी द्यावेत.

  • प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.

  • कायगाव येथे मराठा हुतात्मा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news