

Kalim Qureshi won one of the four seats
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या निवडणुकीत गेल्यावेळीप्रमाणेच यंदाही कलिम कुरैशी यांनी घरातूनच चार उमेदवार उभे केले होते. त्यात स्वतः दोन प्रभागातून रिंगणात होते. परंतु, एमआयएमने दोन्ही ठिकाणी धोबीपछाड देत आस्मान दाखविले. केवळ एकाच काँग्रेसच्या उमेदवारीवर केवळ वहिनीच विजयी झाल्या असून काँग्रेसलाही तेवढ्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत जिन्सी भागातून कलिम कुरैशी हे स्वतःच उमेदवार ठरवून काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळवित होते. यात घरातूनच चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवित होते. गेल्या वेळी देखील कुरैशी यांनी आपला मनमानीपणा कायम ठेवत हम करे सो कायदा, याप्रमाणे जिन्सी भागातून घरातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. हे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आले होते. यात आई, वहिनी आणि पत्नीचा समावेश होता.
यंदा ते १४ आणि ९ क्रमांकाच्या प्रभागातून रिंगणात उतरले होते. तर प्रभाग ९ मधून पत्नीला आणि १४ मधून वहिनीला उमेदवारी दिली होती. यात एक जागा कॉंग्रेसकडून आणि तीन ठिकाणी वंचितच्या उमेदवारीवर ते निवडणूक रिं-गणात होते. या चारपैकी तीन जागांवर कुरैशी यांना एमआयएमनेच धोबीपछाड दिली.
तर केवळ प्रभाग क्रमांक १४ मधून वहिनी विजयी झाल्या आहेत. परंतु, असे असले तरी यंदा एमआयएमने कुरैशींना आस्मान दाखविले, हे देखील तेवढेच नाकारता येणार कलिम कुरैशी हे प्रभाग क्रमांक ९ आणि १४ या दोन्हीतून वंचितच्या उमेदवारीतून रि-गणात उतरले होते. परंतु, या दोन्ही ठिकाणी त्यांना एमआयएमनेच धोबीपछाड देत आस्मान दाखविले.
जलील कुरैशी यांच्यातील राडा एमआयएमचे इम्तियाज जलील आणि कॉंग्रेसचे कलिम कुरैशी हे दोघेही एकमेकांविरोधात आहेत. यापूर्वी देखील विधानसभा असो की, लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत कुरैशी यांनी जलील यांच्याविरोधात काम केले. महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएम विरुद्ध कुरैशी अशीच स्थिती जिन्सी भागात होती. त्यातूनच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जिन्सीत तुफान राडा झाला. यात कुरैशींच्या कार्यकर्त्यांनी थेट जलील यांच्यावरच हल्ला केला होता.