Sambhajinagar News ; विकास जैन यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

रात्रीच एसीपी सागर देशमुख यांच्या तक्रारीवरून विकास जैन यांच्यासह शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल या लाठीहल्ल्यात जखमी तिघांविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
विकास जैन यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

A case has been registered against three people, including Vikas Jain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान शुक्रवारी (दि.१६) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसे नेचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी रिंगण लाठीचार्ज केला होता. यात तिघेही जखमी झाले होते.

Crime News
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एमआयएमचा फडकला झेंडा

पालकमंत्री शिरसाठ यांनी पोलिस आयुक्तांना जाब विचारत संताप व्यक्त केला होता. आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र, रात्रीच एसीपी सागर देशमुख यांच्या तक्रारीवरून विकास जैन यांच्यासह शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल या लाठीहल्ल्यात जखमी तिघांविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीपी सागर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (दि. १६) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा येथे मनपा प्रभाग क्रमांक १८ ते २२ आणि २७ ची मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार, केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या उमेदवार आणि प्रतिनिधींनाच आत सोडले जात होते.

Crime News
Accident News : रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे अपघात; १ ठार

सकाळी ९:०० ते ९:३० च्या सुमारास विकास जैन, शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल हे मुख्य गेटवर आले. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस निरीक्षक प्रमोद कठाणे यांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्याची विनंती केली. मात्र, विकास जैन यांनी मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही का? असे म्हणत ओळखपत्र न दाखवता पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

एसीपी देशमुखांचा गळा पकडला

बंदोबस्त प्रभारी तथा सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख हे त्यांना समजावण्यासाठी गेले असता, जैन यांनी त्यांच्याही अंगावर धावून जात, त्यांचा गळा पकडून त्यांना मागे लोटले आणि हल्ला केला. या गोंधळात शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल यांनीही गेट ढकलून आत प्रवेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news