Chhatrapati Sambhajinagar water supply : २५०० च्या जलवाहिनीतून आजपासून वाढीव पाणी

मनपा आयुक्तांनी झापताच यंत्रणा सज्ज, पहाटेच सुरू होणार पंपिंग, शहरात वाढीव ३० एमएलडी पाणी येणार
Chhatrapati Sambhajinagar water supply
Chhatrapati Sambhajinagar water supplypudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (एमजेपी) अधिकारी आणि जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीच्या प्रमुखांनी कुठल्याही परिस्थितीत शुक्रवारी (दि.१०) जायकवाडी धरणातून नव्या पाणीपुरवठा योजनेची पंपिंग सुरू केलेच पाहिजे, अशी तंबी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी देताच यंत्रणेने दिवसभरात शिल्लक दुरुस्ती काम पूर्ण करून सायंकाळी ३.३० वाजता जायकवाडी धरणातून एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करून जलवाहिनी भरून घेण्यात आली. आता आज पहाटे ५ वाजेपासून पुन्हा पंपिंग सुरू करून शहरात वाढीव ३० एमएलडी पाणी आणले जाणार आहे.

महापालिका आयुक्त येडगे म्हणाले की, नक्षत्रवाडी येथील नवीन पंपहाऊसला पहिल्याच पावसात गळती लागल्यामुळे पंपिंग बंद करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदार कंपनीने पंपहाऊसच्या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम केले. दरम्यान, मुख्य जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्याला गळती लागल्यामुळे फ्लोमीटरमध्ये पाण्याची नोंद होत नसल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

Chhatrapati Sambhajinagar water supply
Water Supply : शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याची डेडलाईन पुन्हा हुकण्याची शक्यता

एमजेपीच्या तज्ज्ञांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य जलवाहिनीची तपासणी केली. त्यात ५० एअरव्हॉल्व्हमध्ये बिघाड अडळून आले, पीएमसीने त्यातील ५ व्हॉल्व्ह खराब झाले असून, त्यांची दुरुस्ती केली तरी पाणी सुरू करता येईल, असे सांगितले. त्यामुळे एमजेपी आणि कंत्राटदार कंपनीने एका व्हॉल्व्हची दुरुस्ती केली.

दरम्यान, मुख्य जलवाहिनीतील व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी शटडाऊन घ्यावा लागेल. त्यासाठी पाच दिवस पाणी पुरवठा बंद ठेवावा लागेल, अशी अडचण सांगितली. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वी ज्या परिस्थितीत पाणीपुरवठा सुरू होता, त्यामध्ये कुठेही अडचणी नसल्यामुळे त्याच पद्धतीने पाणीपुरवठा सुरू करण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी कंत्राटदार कंपनीकडून काहीच होणार नाही, याबाबत हमीपत्रही घेण्यात आले.

त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ३.३० वाजता जायकवाडीतील नव्या पाणी योजनेच्या पंपगृहातील एक पंप सुरू करण्यात आला. त्याद्वारे शहरात पाणी आणण्याचे काम सुरू केले. पंपिंग आणि जलवाहिनीतून पाण्याची आवक सुरू झाल्याचा अंदाज घेत प्रशासनाने पंपिंग बंद केली. आता आज (दि. ११) पहाटेच पंपिंग सुरू करण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar water supply
Tap Connections : मिसारवाडीतून होणार नो नेटवर्क भागांतील नळजोडणी मोहिमेला प्रारंभ

आजपासून येणार वाढीव पाणी

जायकवाडी धरणातील जॅकवेलमधून पंपिंग सुरू केल्यानंतर शहराच्या दिशेने पाण्याची आवक सुरू झाली. परंतु रात्री ८.१५ वाजेपर्यंत पाणी शहरात दाखल झाले नाही. जलवाहिनी भरून झाल्यानंतर पंप बंद केला. आता पहाटे ५.३० वाजेपासून पंपिंग सुरू करण्यात येईल. दुपारपर्यंत शहरात वाढीव ३० एमएलडी येईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

५० व्हॉल्व्ह नादुरुस्त

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरील ५० एअरव्हॉल्व्ह बंद पडले आहेत. या व्हॉल्व्हची दुरुस्ती आणि अप्रोच चॅलनले काम त्यासोबतच २५००, ९०० आणि ७००, १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या एकमेकांना जोडणीच्या कामासाठी लवकरच ७ दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news