Ellora Caves : वेरूळ लेणी परिसरात दमदार बरसला

देश-विदेशांतील पर्यटकांनी घेतला वर्षावाचा मनमुराद आनंद
Ellora Caves
Ellora Caves : वेरूळ लेणी परिसरात दमदार बरसलाfile photo
Published on
Updated on

It rained heavily in the Ellora Caves area

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : तब्बल वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी (दि.१८) दुपारनंतर व रविवारी सकाळपासून वेरूळ लेणी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील उकाडा वाढला होता. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनीही मोठा दिलासा व्यक्त केला. जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी आलेल्या देश-विदेशांतील पर्यटकांनी पावसाचा मनमुराद आनंद घेतला.

Ellora Caves
Sonam Wangchuk Support | सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अंबाजोगाईतून पाठिंबा

अनेक पर्यटक लेण्यांजवळ उभे राहून डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करताना दिसून आले. काहींनी मोबाईलमध्ये या निसर्गरम्य क्षणांचे छायाचित्रण व चित्रीकरण केले, तर अनेकांनी पावसात भिजण्याचाही आनंद लुटला. पावसामुळे लेणी परिसरातील हिरवळ अधिक खुलून दिसू लागली असून, डोंगररांगा धुक्याच्या हलक्या पडद्याने वेढल्या गेल्याने संपूर्ण परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

सरींमुळे लेण्यांभोवती वाहणारे पाण्याचे लहान प्रवाह पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पानुसार, गेल्या वीस दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत होते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तसेच परिसरातील तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Ellora Caves
Sonam Wangchuk support : सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा एल्गार

पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, पावसाळ्यात वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पर्यटकांनी घसरड्या ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे. तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. वीस दिवसांनंतर झालेल्या या पावसामुळे वेरूळ लेणी परिसर पुन्हा एकदा हिरवाईने नटला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news