व्याजदरवाढीने मनपावर वाढला पाणी योजनेच्या कर्जाचा भार

८२२ कोटींच्या कर्जावरील व्याजदर ८.९० टक्क्यांवर : १९३ कोटींच्या उचलवर वर्षाला १.२३ कोटींचे व्याज
sambhajinagar news
व्याजदरवाढीने मनपावर वाढला पाणी योजनेच्या कर्जाचा भारfile photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने घेतलेल्या ८२२.२२ कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हुडको आणि महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीने केलेली ही व्याजदरवाढ शुक्रवारी (दि. १३) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली. त्यामुळे कर्जाचा व्याजदर ८.७५ टक्क्यांवरून ८.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत उचललेल्या १९३ कोटी रुपयांच्या रकमेवर महापालिकेला वर्षाकाठी १ कोटी २३ लाख रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महापालिकेच्या अडचणीत या वाढीमुळे भर पडली आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar News : पाणीप्रश्नावरून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत शहरासाठी २७४० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ६८५.१९ कोटी, राज्य शासनाचा १२३३.३४ कोटी, तर महापालिकेचा ८२२.२२ कोटी रुपयांचा हिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने स्वहिश्शाची रक्कम उभी करण्यासाठी राज्य शासनाने हुडको आणि महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

या कर्जाची परतफेड २०२८ पासून सुरू होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्जाची रक्कम उचलल्यापासून त्यावर व्याज आकारले जात आहे. महापालिकेने आतापर्यंत मंजूर कर्जापैकी १९३ कोटी रुपये उचलून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मागणीनुसार कंत्राटदाराला अदा केले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरातील वाढीमुळे कर्जपुरवठादार संस्थांनी व्याजदरात ०.१५ टक्क्यांची वाढ केली.

sambhajinagar news
Pakistan minister visit to India: पाकिस्तान आपल्या सर्वात अनुभवी मंत्र्याला भारतात पाठवणार? 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिलीच भेट

या सुधारित ८.९० टक्के व्याजदराला शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्शाची रक्कम महापालिकेला मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित कामांचा खर्च महापालिकेच्या स्वहिश्शातून केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामांच्या बिलांची मागणी झाल्यानंतर महापालिका कर्जाची उचल करून कंत्राटदाराला रक्कम अदा करते. आतापर्यंत १९३ कोटी रुपये देण्यात आले असून, आणखी ३१ कोटी रुपयांच्या बिलांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.

२०२८ पासून हप्त्यांचा बोजा

महापालिकेने स्मार्ट सिटीतील स्वहिस्सा भरण्यासाठी यापूर्वीच २५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाचे हप्ते फेडताना महापालिकेची दमछाक होत माविका प्रपती संभाद्योतयार आहे. त्यात आता पाणीपुरवठा योजनेच्या ८२२.२२ कोटी रुपयांच्या कर्जाची भर पडली आहे. २०२८ पासून या कर्जाची परतफेड सुरू झाल्यानंतर दरमहा किमान १० कोटी रुपयांपर्यंतचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर मोठा ताण निर्माण होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.