

Insult to freedom fighters by the Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जाणार आहे. मात्र मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात जीवाची बाजी लावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांसह माजी राष्ट्रपती आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचा फोटो महापालिकेच्या टप्पा क्र. ३ इमारतीच्या तळघरात धूळखात पडून असल्याचे वेदनादायी चित्र समोर आले आहे.
महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेणाऱ्या महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केवळ औपचारिकताच पाळल्या जात असल्याचे यावरून दिसून येत आहे. या महापुरुषांनी दिलेली शिकवण अंगीकृत करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
महापालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांच्यासह स्थायी सभापतीची दालने आहेत. या दालनात शासन नियमाप्रमाणे महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. मात्र सध्या या दालनांचे दुरुस्तीचे काम सुरू असून, या दालनांमधील साहित्य मनपाच्या तळघरात टाकण्यात आले आहे. दरम्यान स्मार्ट शहर सुंदर शहर अशी घोषणा करत शहराला देशभरातील शहरांमध्ये सर्वोकृष्ट शहर बनविण्यासाठी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
तसेच गतवर्षी आयुक्तांनी शहरात महास्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत महापालिकेतील सर्व विभागांसह परिसर स्वच्छ करण्यात आला होता. विभागातील धूळखात पडलेल्या फाईली, अडगळीचे सामान, भंगार आदींची विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेतील विभागांचे रूपडे पालटले होते. मात्र लाकडी व लोखंडी फर्निचर व इतर सामान टप्पा क्र.३ इमारतीच्या तळघरात नेऊन टाकण्यात आलेले आहे. वर्षभरापासून हे सामान तळघराची मशोभाफ वाढवत आहे. महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची जागा अपुरी पडत असून, त्यात या भंगार सामानाने अर्धी जागा व्यापली आहे. या भंगारात मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा
महापुरुषांचे फोटो अडगळीत
मनपाचे तत्कालीन शहर अभियंता ए. बी. देशमुख हे सेवानिवृत्त झाले आहेत, मात्र त्यांना कंत्राटी पद्धतीवर महापालिकेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी शहर अभियंत्याच्या दालनासमोरच लाखो रुपये खर्च करून नवे प्रशस्त दालन तयार करण्यात आले आहे. मात्र महापालिकेत महापुरुषांच्या फोटोसाठी एक स्वतंत्र रूम नसून टप्पा क्र. ३ इमारतीच्या तळ-घरातील अडगळीत या महापुरुषांचे फोटो टाकण्यात आले आहेत.