

Beware! Eating samosas, jalebis increases the risk of heart disease
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गरम-गरम समोसे आणि रसरशीत गोड जिलेबीसारखे पदार्थ समोर बघून कुणालाही खाण्याबा मोह आवरणार नाही, मात्र हे पदार्थ खाणे अनेक आजारांचे कारण ठरू शकते. तज्ज म्हणतात, त्याच-त्या तेलात तळलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने ट्रॉन्स फॅट वाढतो. त्यातून लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, ब्लॉकज वाढून हृदयविकाराचा धोकाही बळावतो. त्यामुळे तळलेले पदार्थ खाणे टाळावे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला.
आजकालच्या धकाधकी जीवनामुळे बदलेली नव्हे तर बिघडलेली जीवनशैली ही अनेक आजार वाढण्याचे कारण ठरत आहे. त्यातही तेल आणि साखरेचे अतिसेवन हे लठ्ठपणा, मधुमेह, उच्ब रक्तदाब आणि हृदयविकार हे प्रमुख आहे. जंकफूड आणि बाहेर उघड्यावर तळलेले विविध खाद्यपदार्थांवर खस्र्याकडून ताव मारला जातो.
दररोज सकाळी हॉटेलमध्ये जाऊन समोसा, भजे, जिलेबी खाणारेही अनेक जण आहेत. मात्र घराबाहेर तळलेले पदार्थ खाताना तेलाची शुद्धता, वापरले जाणाऱ्या पदार्थाचा दर्जा याविषयी खात्री नसते. तसेच विक्रीच्या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बाहेर उघड्यावरचे खाणे त्यातही तळलेले पदार्थ न खाणेच बरे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
आरोग्यदायी पोषक आहाराला प्रोत्साहन
काही दिवसांपूर्वी काही माध्यमांमध्ये समोसा, जिलेबी सारख्या पदार्थावर सिगारेटसारखा इशारा देण्याचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हे वृत्त खोटे असून, केंद्रीय आरोग्य विभागाने आरोग्यदायी पोषक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध खाद्यपदार्थांमध्ये लपलेली चरबी आणि अतिरिक्त साखरेबावत सावध वर्तणुकीसाठी खवय्यांना आणि ग्राहकांना सूचित करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे अन्न व औषधी प्रशासनाने स्पष्ट केले.