सौजन्याने वागा, शिस्तीत सुरक्षा करा : अधिष्ठाता

घाटीच्या रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना निर्देश; घाटीत १०६ जवान रुजू
sambhajinagar news
सौजन्याने वागा, शिस्तीत सुरक्षा करा : अधिष्ठाताfile photo
Published on
Updated on

Instructions to security guards at hospitals in the Ghati; 106 soldiers have been deployed in the Valley

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटी रुग्णालयाच्या सुरक्षा ताफ्यात अधिकचे १०६ सुरक्षारक्षक नुकतेच कर्तव्यावर रुजू झाले आहेत. आधीचे १५४ आणि नवे १०६ असे तब्बल २६० सुरक्षारक्षकांचे बळ आता घाटीला मिळाले आहे. या नवीन सुरक्षारक्षकांना मार्गदर्शन करताना घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रुग्ण, डॉक्टर आणि येणाऱ्या प्रत्येक नातेवाइकाशी सौजन्याने वागा आणि शिस्तीत सुरक्षा करा, असे स्पष्ट निर्देश दिले.

sambhajinagar news
टोकन पद्धतीने दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त

गरजू आणि गरीब रुग्णांचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (एमएसएफ) वाढीव १०६ सुरक्षारक्षक घेण्यास आणि त्यासाठी वार्षिक ५.५६ कोटी रुपये खर्चास शासनाने ११ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली होती.

त्यानुसार हे १०६ वाढीव सुरक्षारक्षक टप्प्याटप्प्याने घाटीत रुजू झाले आहेत. यात ६ सुरक्षा पर्यवेक्षक, १० शस्त्रधारी सुरक्षारक्षक, २० महिला सुरक्षारक्षक व ७० पुरुष सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. याआधी घाटीत मेस्कोमार्फत ९६ आणि एमएसएफमार्फत ५८ असे एकूण १५४ सुरक्षारक्षक होते.

sambhajinagar news
ओडिसाहून गांजाची तस्करी करणारे गजाआड

आता नवीन १०६ एमएसएफ जवानांसह ही संख्या २६० झाली आहे. या जवानांना सोमवारी (दि.२३) सकाळी ७.३० वाजता अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे आणि सुरक्षा अधिकारी सुरेश भाले उपस्थित होते.

मारहाण, शिवीगाळ टाळून मदत करा

नवीन सुरक्षारक्षकांना कामाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. सुक्रे म्हणाले की, कोणत्याही रुग्णाला किंवा नातेवाइकांना मारहाण व शिवीगाळ न करता त्यांना मदत करावी. तसेच सर्वांनी शिस्त पाळणे आणि दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी जवानांना दिल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news