ओडिसाहून गांजाची तस्करी करणारे गजाआड

ओडिसा येथून ट्रकमधून गांजाची तस्करी करून शहरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका तडीपार गुंडासह त्रिकुटाला करोडी शिव-ारात गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.
sambhajinagar news
ओडिसाहून गांजाची तस्करी करणारे गजाआडfile photo
Published on
Updated on

Gangs smuggling marijuana from Odisha

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

ओडिसा येथून ट्रकमधून गांजाची तस्करी करून शहरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका तडीपार गुंडासह त्रिकुटाला करोडी शिव-ारात गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ४ किलो ८७३ ग्रॅम गांजा, एक ट्रक आणि मोबाईल असा १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

sambhajinagar news
Fraud Case : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ३८ लाखांचा गंडा

शेख मोहम्मद खालीद शेख नईम (३८), मोहम्मद मन्सूर शेख (२८, दोघेही रा. सादातनगर) आणि शेख अकील शेख सलीम (३१, रा. जहागीरदार कॉलनी, रेल्वे स्टेश नजवळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवारी (दि. २४) दिली.

करोडी शिवारातील चामुंडा इंटरप्रायजेस येथे माल घेऊन आलेल्या एका ट्रकमध्ये शेख अकील शेख खालिद गांजा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता तिथे ट्रक (एमएच-१७-बीवाय-६९७४) आढळून आला.

sambhajinagar news
टोकन पद्धतीने दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त

ट्रकची झडती घेतली असता, चालक सीटच्या मागील बाजूस असलेल्या बॉक्समध्ये ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचा गांजा लपवलेला आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहाय्यक मोहम्मद मन्सूर

आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक संदीप काळे, संदीप तायडे, कैलास काकड, योगेश नवसारे, दादासाहेब झारगड, राहुल बंगाळे, अमोल मुगळे, शेख जुनेद, अक्षय नाटकर, सागर साळवे, तातेराव शिनगारे यांच्या पथकाने केली.

तडीपार गुंडाचा सहभाग

अटकेतील आरोपी शेख अकील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला शहरातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते. तरीही तो विनापरवानगी शहरात वावरताना आढळून आल्याने त्याच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे. तसेच तिन्ही आरोपींवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news