

IndiGo services disrupted for third consecutive day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा इंडिगोचे मुंबईहुन छत्रपती संभाजीनगरला येणारे सकाळचे विमान रद्द केले. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते मुंबई या दोन्ही विमानसेवा रद्द झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान सेवा सुरळीत होण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
इंडिगोच्या अंतर्गत समस्येमुळे मंगळवार आणि बुधवारी विमानसेवा रद्द करण्यात आली होती. काही प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली तर काही प्रवाशांना रस्त्याने मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान गुरुवारीही सकाळचे आणि सायंकाळचे विमान रद्द झाल्याची माहिती ऐनवेळी प्रवाशांना देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. ही विमानसेवा सुरळीत होण्यासाठी ४८ तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी ४८ तासांनंतरही ही सेवा सुरळीत होईल की नाही, या चिंतेने इंडिगाचे प्रवासी हैराण झाले.