Crime News : आम्ही इथले डॉन आहोत, राहायचे असेल तर हप्ता दे

मुकुंदवाडीत तडीपार गुंडाच्या टोळीने परप्रांतीय मजुराला चाकूहल्ला करून लुटले
Crime News
Crime News : आम्ही इथले डॉन आहोत, राहायचे असेल तर हप्ता देfile photo
Published on
Updated on

In Mukundwadi, a gang of Tadipar gangsters robbed a migrant laborer with a knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तू बाहेरून आला आहेस, आम्ही इथले डॉन आहोत. तुला जर इथे राहायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत तडीपार गुंडाच्या टोळीने परप्रांतीय मजुरावर चाकूने वार करत लुटले. ही घटना मंगळवारी (दि.१८) रात्री ९ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील संजय नगरमध्ये घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Marathi Language : मराठी भाषा व्यावहारिक ज्ञान : रिक्षाचालकांची तपासणी

तडीपार गुन्हेगार सिद्धार्थ सोनवणे ऊर्फ सिध्या, रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज चव्हाण ऊर्फ लल्या, विकास सिद्धार्थ सोनवणे युवराज चव्हाण इंगोले या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपीना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

फिर्यादी मनबहादूर भीमबहादूर थापा (४८, रा. गल्ली नं. ०३, संजय नगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, ते चिकलठाणा येथील नम्रता केटरिंगमध्ये काम करतात आणि ते त्यांच्या इतर मित्रांसोबत मुकुंदवाडीत विकास इंगोले सुमारास भाड्याने राहतात. १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या ते मार्केटमध्ये जाण्यासाठी घराबाहेर उभे होते. तेवढ्यात वस्तीत राहणारे युवराज चव्हाण (लल्या), सिद्धार्थ सोनवणे (सिध्या) आणि त्यांचे दोन साथीदार तिथे धावत आले. त्यांनी मनबहादूर यांना पकडून म्हटले, तू बाहेरून आला आहेस, आम्ही इथले डॉन आहोत. तुला जर इथे राहायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी खंडणीची मागणी केली.

Crime News
Sambhajinagar News : समिती स्थापनेसह विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा महापालिकेसमोर ठिय्या

दोघे सराईत गुन्हेगार

सिद्धार्थ सोनवणे याला आठ महिन्यापूर्वी तडीपार केले होते. त्याच्यावर यापुर्वी आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार युवराजही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, मुकुंदवाडीत गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने तडीपार असताना सिध्या मुकुंदवाडीत निर्धास्तपणे लूटमार करत फिरत असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news