Marathi Language : मराठी भाषा व्यावहारिक ज्ञान : रिक्षाचालकांची तपासणी

परिवहन विभागाच्या आदेशानुसार गुरुवार (दि.२०) पासून अमराठी रिक्षाचालकांच्या मराठी भाषा व्यावहारिक ज्ञानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
Marathi Language
Marathi Language : मराठी भाषा व्यावहारिक ज्ञान : रिक्षाचालकांची तपासणीfile photo
Published on
Updated on

Practical Knowledge of Marathi Language: Inspection of Auto-rickshaw Drivers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः परिवहन विभागाच्या आदेशानुसार गुरुवार (दि.२०) पासून अमराठी रिक्षाचालकांच्या मराठी भाषा व्यावहारिक ज्ञानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकाने गुरुवारी २१६ रिक्षाचालकांची तपासणी केली. यात २१ जणांना मराठीचे ज्ञान कमी असल्याने त्यांना एक महिन्यांत शिकवणी पूर्ण करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यानंतर मात्र कारवाईचा इशारा आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

Marathi Language
Sambhajinagar News : गुंठेवारीत दंड कपातीचा मनपा प्रशासनाचा प्रस्ताव

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवारपासून मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदरील तपासणी ही रेल्वे स्टेशन परिसर, सिडको बसस्थानक, बीड बायपास परिसर येथे करण्यात आली. तपासणीमध्ये मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या २१ रिक्षा व टॅक्सी चालकांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

Marathi Language
Crime News : अवघ्या २२ सेकंदात मोपेडच्या डिक्कीतील दीड लाखाची रोकड लंपास

नोटीस बजावण्यात आलेल्या रिक्षाचालकास मराठी भाषेचे प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून प्रशिक्षण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही तपासणी मोहीम मोटार वाहन निरीक्षक राहुल चाकणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक दिव्या कोळसे, माधवी चत्रे यांनी राबवली. यावेळी अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांशी संवाद साधत त्यांना मराठीचे जुजबी ज्ञान आहे की नाही याची परीक्षा घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news