Sambhajinagar News : समिती स्थापनेसह विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा महापालिकेसमोर ठिय्या

सक्षम ॲपमधील अर्ज भरण्याची झोन कार्यालयातच सुविधा द्या : दिव्यांग संघटनांची मागणी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : समिती स्थापनेसह विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा महापालिकेसमोर ठिय्याfile photo
Published on
Updated on

Disabled people sit in front of the Municipal Corporation for various demands including the formation of a committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समिती स्थापनेसह विविध मागण्यासाठी दिव्यांग संघटनांच्यावतीने गुरुवारी (दि.२०) महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दिव्यांगांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या सक्षम अॅपवरील अर्ज भरण्याची जबाबदारी आशा वर्कर्सवर सोपविण्याच्या निर्णयाला दिव्यांग संघटनांनी विरोध केला असून महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयांतच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : कर्मचाऱ्यांचे काम बंद; अप्पर तहसीलमध्ये दुपारनंतर शुकशुकाट

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्षम अॅपवर माहिती व अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, यासाठी आशा वर्कर्स घरोघरी पोहोचतील, असे प्रशासनाचे नियोजन आहे. प्रत्यक्षात सरकारी कर्मचारी घरोघरी पोहोचण्याच्या योजनांचा अनुभव फारसा समाधानकारक नाही. त्यामुळे शहरातील सर्व झोन कार्यालयांमध्ये सक्षम अॅपचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच दिव्यांगांना कार्यालयात मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

यासह दिव्यांगांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी महापालिकेने तातडीने दिव्यांग समिती गठित करावी आणि या समितीत दिव्यांग संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करावा, अशीही मागणी करण्यात आली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : गुंठेवारीत दंड कपातीचा मनपा प्रशासनाचा प्रस्ताव

दरम्यान, बाल संगोपनाचे एक वर्षाचे अनुदान प्रलंबित असून, ते तत्काळ अदा करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सीर अन्सारी, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख मुनीर, दिव्यांग आधार विकासचे जिल्हाध्यक्ष शेख नासेर, मिर्झा फैज अली यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व दिव्यांग आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिव्यांगांच्या मागण्यांबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि त्याची माहिती दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे अन्सारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news