Chhatrapati Sambhajinagar illegal hoardings : अबब... एजन्सीचेच तब्बल २२ अवैध होर्डिंग्ज

१५ वर्षांपासून बुडविला महसूल, मनपाने कारवाई करताच १२ लाख भरले
Chhatrapati Sambhajinagar illegal hoardings
Chhatrapati Sambhajinagar illegal hoardingspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात महापालिकेने सुमारे १२ एजन्सींचे ३५० हून होर्डिंग असून त्यासर्वांना परवाना दिला आहे. मात्र, असतानाही या एजन्सींनी मागील १० ते १५ वर्षांपासून अनेक ठिकाणी अवैध होर्डिंग्ज उभारले आहेत. याबाबत तक्रार होताच महापालिकेने या होर्डिंग्जची तपासणी केली. त्यात सहा मोठे अवैध होर्डिंग अतिक्रमण हटाव विभागाला अढळून आले असून त्यावर शनिवारी (दि. १८) कारवाई करून जमीनदोस्त केले. या मोहिमेनंतर एजन्सीधारकांनी १२ लाख रुपयांचा महसूल जमा केला.

शहराच्या विविध भागांत ३५० हून अधिक होर्डिंग आहेत. सतत अवैध होर्डिंगवरून महापालिकेच्या समेत चर्चा होत असल्याने दहा वर्षांपूर्वी महापालिकेने सर्व परवानाधारक होर्डिंग्जला क्रमांक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात सुमारे ३५० होर्डिंग्ज असल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात होर्डिंग्जची संख्या अधिक आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यावरून प्रशासनाने या होर्डिंग्जचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

Chhatrapati Sambhajinagar illegal hoardings
Nashik Land Issue | शासनाच्या जमिनीवर खासगी व्यक्तीची नावे

मागील एक महिन्यांपासून महापालिकेच्या पथकाने महापालिकेच्या जागेवरील आणि खाजगी जागेतील होर्डिंगचा शोध घेतला. त्यात मागील एक महिन्यापासून नूतनीकरण न केलेल्या, थकबाकी असलेल्या होर्डिंगचा मनपाकडून शोध घेण्यात येत होता.

या मोहिमेत वेगवेगळ्या एजन्सीधारकांचे २२ होर्डिंग मनपाला सापडले. शनिवारी एकाचवेळी सर्व होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, कारवाईचा बडगा उगारताच १२ एजन्सी चालकांनी मनपाकडे १२ लाख ८७ हजार रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. आता त्यांना ५० हजार रुपये प्रमाणे दंड आकारणी केली जाईल. त्यानंतर त्यांचे होर्डिंगचे नूतनीकरण करून दिले जाणार आहे. शनिवारी दिवसभर झालेली कारवाई मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व त्यांच्या पथकाने केली.

Chhatrapati Sambhajinagar illegal hoardings
Nashik Division Tribal Land Scam | आदिवासी जमीन व्यवहारांवर बडगा; मूळ मालकांना परत केल्या जमिनी

येथील होर्डिंग्ज पाडले

क्रांतीचौक, सेव्हन हिल, सातारा, सिल्लेखाना येथे एक तर हसूल येथील दोन होर्डिंग पाडण्यात आल्या.

१५ वर्षात नूतनीकरणच नाही

शहरातील काही एजन्सींनी सहा होर्डिंगचे नूतनीकरण मागील दहा ते पंधरा वर्षांपासून करण्यात आलेले नव्हते. यात हिंदूस्तान पेट्रोलियमचे २ आणि २ मनु अॅड एजन्सीचे आहेत. तर सागर अॅड, नागपाल ग्रुपचे प्रत्येकी एक होर्डिंग होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news