Pitru Paksha : पितृपक्षामुळे विविध मार्गावरील ७८ बस फेऱ्या रद्द

दरदिवशी ११ हजार ८११ किलोमीटरच्या उत्पन्नात घट
Pitru Paksha
Pitru Paksha : पितृपक्षामुळे विविध मार्गावरील ७८ बस फेऱ्या रद्द file photo
Published on
Updated on

78 bus trips on various routes cancelled due to Pitru Paksha

छत्रपती, संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पतृपक्ष पंधरवड्याची सुरुवात होताच विविध मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटते. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवासी हा या दरम्यान जास्त प्रवास करत नाही. त्यामुळे एसटीने विविध मार्गावरील २८ बसच्या सुमारे ७८ फेऱ्या रद्द केल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रण अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

Pitru Paksha
Nanded News : बोगस बियाणे प्रकरणी 'इनोव्हेज'ला दणका !

८ सप्टेंबरपासून पितृपक्ष पंधरवड्याची सुरुवात झाली आहे. यादरम्यान ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांनिमित्त शहरात येण्याचे मोठ्या प्रमाणात टाळतात. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट होत असते. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ज्या मार्गावर प्रवासी संख्या घटणार आहे, त्या मार्गावरील काही बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ आगारांतून विविध मार्गावर धावणाऱ्या २८ बसच्या सुमारे ७८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या वस २१ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पितृपक्ष पंधरवड्यात दरवर्षी गर्दी कमी असलेल्या मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो.

Pitru Paksha
Onion prices fell : कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी हैराण

त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ११ हजारांपेक्षाही जास्त किमी रद्द दरम्यान या बस दररोज सुमारे ११ हजार ८११ किलोमीटर प्रवाशांना सेवा देत होत्या. या रद्द करण्यात आल्याने दररोज ११ हजार ८११ किलोमीटर रद्द होणार आहे. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news