

Hundreds of office-bearers from the Uddhav Thackeray faction join the BJP
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिवाजीनगर भागातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन सोडत हाती कमळ घेत भाजपचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (दि.१४) मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणूकीत शिवाजीनगर प्रभागातून निवडूण आलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांच्या संपर्क कार्यालयाचे शनिवारी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उबाठा गटाचे विभागप्रमुख विनोद सोनवणे यांच्यासह रामदास वाघमारे, सत्यवान रगडे, रावसाहेब राऊत, हेमंत जाधव, रितेश ठेंगे, विष्णू सोनवणे, गणेश निकम, छबूराव ताके, ज्ञानेश्वर घावट, रघुनाथ चेन्ने आणि बंटी उखळकर आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
हा प्रवेश सोहळा मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेवक राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शित- ोळे, महापौर समीर राजुरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, गटनेते प्रा. गोविंद केंद्रे, शहर सरचिटणीस ताराचंद गायकवाड, संजय बोराडे, नगरसेविका दया गायकवाड, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, शशांक विसपुते, पंकज भारसाखळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत आगामी काळात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.