Crime News : सुरक्षा रक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला

चौघांविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा दाखल
Crime
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Security Guard Attacked with an Iron Rod

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मित्राचा अपघात झाल्याचे सांगून एका सुरक्षा रक्षकाला दुचाकीवर बसवून रेल्वे अंडरपासखाली नेल्यानंतर, त्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १२ मार्च रोजी रात्री मिटमिटा गाव परिसरात घडली.

Crime
Crime News : वकिलाला लुटले : रोखसह मोबाईल पळवला

रंजीत दिगंबर मुळे, कृष्णा कडुवा मुळे, आनंद गंगाधर चव्हाण आणि युवराज मच्छिद्र देवकर (सर्व रा. मिटमिटा परिसर) अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध ** छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, नितीन राधाकिसन जाधव (३३, रा. मिटमिटा) हे मिटमिटा-तीसगाव रोडवर एका ठेकेदाराकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. १२ मार्च रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास आनंद चव्हाण आणि युवराज देवकर हे जाधव यांच्याकडे आले.

Crime
Cattle Smuggling : अवैधरीत्या गोवंशांची वाहतूक करणारे दोघे ताब्यात

त्यांनी ङ्गमित्राचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगून त्यांना दुचाकीवर बसवले आणि मिटमिटा गावाजवळील रेल्वे अंडरपासकडे नेले. त्या ठिकाणी अगोदरच दवा धरून बसलेल्या रंजीत मुळे आणि कृष्णा मुळे यांनी जाधव यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले आहेत. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news