अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा हल्ला; ८२ पर्यटक जखमी

दोन महिन्यांत सहावी घटना; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Honeybees Attack Again at Ajanta Caves
अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा हल्ला; ८२ पर्यटक जखमीfile photo
Published on
Updated on

Honeybees Attack Again at Ajanta Caves; 82 Tourists Injured

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात गुरुवारी (दि.२) दुपारी मधमाशांनी अचानक हल्ला चढवत तब्बल ८२ पर्यटकांना जखमी केले. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी घटना असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Honeybees Attack Again at Ajanta Caves
Honeybee Attack : अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांचा हल्ला; ३० पर्यटक जखमी

दुपारी सुमारे ४.३० वाजेच्या सुमारास लेणी क्रमांक १० परिसरातील आगे मोहळा पोळ्यांवरील मधमाशा अचानक आक्रमक झाल्या आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविला. काही क्षणांतच लेणी क्रमांक ४, ९ आणि २६ समोरील पोळ्यांमधील मधमाशाही उठल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून, पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला.

घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत लेणी क्रमांक २ पासून पुढे जाण्यास तसेच लेणी क्रमांक २० नंतरचा मार्ग बंद केला. त्यामुळे काही पर्यटक संभाव्य हल्ल्यातून बचावले. जखमींपैकी काहींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, तर काहींनी खासगी रुग्णालयांत उपचार घेतले.

Honeybees Attack Again at Ajanta Caves
Ajanta Caves bee attack: अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा विदेशी पर्यटकांवर हल्ला; शंभरहून अधिकजण जखमी

मधमाशांचा वाढता धोका; १३ पोळ्यांचा विळखा

अजिंठा लेणी परिसरात सध्या आगे मोहळा भागात सुमारे १३ मोठी पोळी असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या पोळ्यांमधील मधमाशा वारंवार आक्रमक होत असून, पर्यटकांवर हल्ले करत आहेत. आतापर्यंत सहा वेळा हल्ले होऊन शेकडो पर्यटक जखमी झाले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

परिसरातील मधमाशांची पोळी तातडीने हटवावीत किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावीत, अशी मागणी पर्यटकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी येथे देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र, अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होत असून, पर्यटनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news