Ajanta Caves bee attack: अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा विदेशी पर्यटकांवर हल्ला; शंभरहून अधिकजण जखमी

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला.
Ajanta Caves bee attack
Ajanta Caves bee attackfile photo
Published on
Updated on

Ajanta Caves bee attack:

छत्रपती संभाजीनगर: जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. या घटनेत देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १०० ते १२० जणांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले.

Ajanta Caves bee attack
Reel star Arun Tupe death: रील स्टार अरुण तुपेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक बस पार्किंग परिसरात असताना मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला केला. यात श्रीलंका येथील ८० पर्यटकांचा गट, थायलंड येथील १० पर्यटकांचा गट, तसेच जबलपूर येथील १० पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, बसमधील पर्यटकांना खाली उतरू न देता चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित स्थळी वळवल्याने मोठा अनर्थ टळला. जबलपूर येथील ७ वर्षीय चिमुरडीच्या चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा सुजला असून तिची आईदेखील जखमी झाली आहे. जखमी पर्यटकांना उपचारासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालय तसेच परिसरातील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले असून घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news