Chhatrapati Sambhajinagar Crime : कर्जाच्या विळख्यामुळे पत्कारला चोरीचा मार्ग

उच्चशिक्षित व्यावसायिक तरुण बनला साखळीचोर
Chhatrapati Sambhajinagar Crime
आरोपीकडून पोलिसानी जप्त केलेला ऐवज.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : व्यवसायात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे पाच लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने झटपट पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी थेट सोनसाखळी चोरीचा मार्ग पत्कारला. शहरातील दोन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या अमोल बालाजी बाराटे (२९, रा. बन्सीलालनगर) याला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.२८) समर्थनगर परिसरातून अटक केली. आरोपीकडून दोन गुन्ह्यांतील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, पुढील तपास उस्मानपुरा पोलिस करीत आहेत.

समर्थनगर परिसरात दीपाली प्रवीण जाधव (३२) यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली होती. त्यानंतर संत एकनाथ रंगमंदिरासमोर सुनीता गिरीश सांगवीकर (६६, रा. न्यू उस्मानपुरा) यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावला होता. या दोन्ही घटनांचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Kolhapur Crime : नशेखोर, शस्त्रधारी गुंडांमुळे कोल्हापूर शहर, उपनगरे दहशतीखाली!

तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेली मोपेड आरोपीच्या मेहुण्याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. संशय येऊ नये म्हणून आरोपीने गुन्हा करताना वाहनाची नंबरप्लेट काढून ठेवली होती.

ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, अंमलदार योगेश नवसारे, प्रदीप दंडवते, विजय निकम, जालिंदर गोरे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, विजय घुगे, लखन गायकवाड व प्रमोद सुरशे आदींनी केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Shirur Chain Snatching Arrest: शिरूरमध्ये सोनसाखळी चोरट्याला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जापायी अमोल बाराटे वळला गुन्हेगारीकडे

अमोल बाराटे हा एमबीए पदवीधर असून, जिम ट्रेनर म्हणूनही काम करतो. गारखेड्यातील खिंवसरा पार्क परिसरात न्यूट्रिशन सप्लिमेंट्स विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. २०२३ मध्ये त्याने प्रेमविवाह केला असून, त्याचे सासरे शहरातील नामांकित बांधकाम कंत्राटदार आहेत. मात्र व्यवसायात मोठा तोटा झाल्याने त्याच्यावर सुमारे पाच लाखांचे कर्ज झाले. व्यवसायातून कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने झटपट पैसे मिळविण्यासाठी त्याने सोनसाखळी चोरीसारखा गंभीर गुन्हा केल्याची कबुली तपासात समोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news