Helmet News : शहरात हेल्मेटची विक्री तब्बल हजारपटीने वाढली

सक्तीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम, दुचाकीस्वारांकडून हेल्मेट घालण्यास पसंती
Helmet News
Helmet News : शहरात हेल्मेटची विक्री तब्बल हजारपटीने वाढलीfile photo
Published on
Updated on

Helmet sales in the city have surged a staggering thousand-fold

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर: शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे हेल्मेटच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. आधी साधारण एका विक्रेत्याकडे महिन्याला ३ ते ४ हेल्मेटची विक्री व्हायची. आता हेच प्रमाण दररोज ८ ते १० हेल्मेटच्या विक्रीपर्यंत वाढले आहे. टक्केवारीनुसार हे प्रमाण हजारो पटीत वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Helmet News
Sambhajinagar News : वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या नोटिशीला हरित लवादात आव्हान

शहरात जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांत तब्बल २४४ जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. या मृतांमध्ये सुमारे ६० टक्के प्रमाण हे केवळ दुचाकीस्वारांचे असून, त्यात १८ ते ४१ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आणि चिंताजनक आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अगोदर पोलिस दल त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीबाबत सूचना दिल्या आणि कारवाई सुरू केली.

महिनाभरानंतर १ सप्टेंबरपासून शहरात नागरिकांना हेल्मेट अनिवार्य करण्यात आले. या ९ दिवसांत वाहतूक पोलिसांसह सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून ३० हजारांपेक्षा अधिक दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

एक हजार रुपयांचा दंड लागत असल्याने दुचाकीस्वारांकडून हेल्मेट घालण्यास प्राधान्य देत आहे. याच कारणामुळे शहरातील दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर आणि खरेदी वाढल्याने ऑटोमोबाईल व्यावसायिकांकडे लगबगही वाढल्याचे दिसत आहे. शहरात हेल्मेट सक्त्तीमुळे झालेल्या या सकारात्मक बदलामुळे वाहनचालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जाणीव वाढली आहे. अनेकजण आधीपासून हेल्मेटचा वापर करताना दिसून येतात. ही संख्या आता हळूहळू वाढत असल्याचे चित्र शहरातील वाहतूक सिग्नलवर आणि रस्त्यावर दिसून येत आहे.

Helmet News
bribery trap : गुन्ह्याचे 'तपासनीस' की गुंडांचे 'मदतनीस' ? मुकुंदवाडी ठाण्यात तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रॅप
हेल्मेटची विक्री वाढली हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे विक्रीत वाढ झाली आहे. दररोज सरासरी ८ ते ९ हेल्मेट विकत आहेत. आधी महिन्याला ३ ते ४ हेल्मेटची विक्री व्हायची. दिल्ली, पुणे, अमरावतीसह माल येतो. विविध बॅण्डेड कंपन्यांची हेल्मेट ८०० रुपयांपासून पुढे आहेत. दुचाकीस्वारांनी सुरक्षितेसाठी चांगल्या व उच्च दर्जाच्या हेल्मेटचा वापर करावा.
- सोमनाथ काळवणे, ऑटोपार्टस् व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news