bribery trap : गुन्ह्याचे 'तपासनीस' की गुंडांचे 'मदतनीस' ? मुकुंदवाडी ठाण्यात तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रॅप

एपीआय पाठोपाठ आता पीएसआय रायटरसह लाचेच्या जाळ्यात
sambhajinagar Crime News
Crime News : गुन्ह्याचे 'तपासनीस' की गुंडांचे 'मदतनीस' ? मुकुंदवाडी ठाण्यात तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रॅपfile photo
Published on
Updated on

After the API, now a PSI is also caught in a bribery trap

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी एका महिलेकडून १० हजार रुपयांची लाच घेताना मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (४१) आणि अंमलदार सुभाष छगन राठोड (३६) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ८) रात्री उशिरा रंगेहाथ पकडले. दोघांना बुधवारी (दि.९) न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : 'स्कोडा' करणार 'जेएसडब्ल्यू'च्या साथीने वाहन निर्मिती

विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी (५ जून) याच पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे आणि अंमलदार गोकुळ खटावकर यांनाही अशाच प्रकरणात आरोपीकडून लाच घेताना अटक झाली होती. मुकुंदवाडी पोलिसच सराईत गुन्हेगारांना लाच घेऊन मदत करू लागल्याने अगोदरच गुन्हेगारांमुळे हैराण असलेल्या मुकुंदवाडी भागातील नागरिकांना पोलिसांचे नेमके चाललेय काय ? असा प्रश्न पडला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय महिला तक्रारदार आणि त्यांच्या दोन मुलांवर सिडको चौकात पोह्यात मीठ कमी असल्याने एका रिक्षाचालकांवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आणि शेजाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल आहेत. गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रशांत पासलकर होते, तर सुभाष राठोड हे त्यांना मदतनीस म्हणून काम करत होते.

या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि तक्रारदार महिलेच्या मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी पासलकर आणि राठोड यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ७ सप्टेंबर रोजी थेट एसीबीकडे तक्रार केली. त्याच दिवशी एसीबीने ठाण्यात जाऊन पडताळणी केली. त्यावेळी पीएसआय पासलकर यांच्या समक्ष अंमलदार राठोड याने १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपये स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले.

sambhajinagar Crime News
Kunbi certificates : जिल्ह्यात २५ हजार ९५८ कुणबी प्रमाणपत्र वितरित

मंगळवारी (दि. ८) एसीबीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा रचला. यावेळी पीएसआय पासलकर याने पंचांसमक्ष दोन्ही हाताची दहा बोटे दाखवून १० हजार रुपयांची मागणी खुणावून केली. तर, अंमलदार सुभाष राठोड याने १० हजारांची मागणी करून तडजोडीअंती महिलेकडून ५ हजारांची पावडर लावलेली नोट स्वीकारताच एसीबीच्या पथकाने राठोड आणि पासलकर या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे, सिनकर आणि तोडकर यांच्या पथकाने केली.

वरिष्ठांचा वचक संपला ?

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वीच, ५ जून रोजी याच ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय नागुसिंग बहुरे आणि अंमलदार गोकुळ अनिलराव खटावकर यांना ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने ठाण्यातच अटक केली होती. एका सराईताविरुद्ध आलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. एका एपीआयवर कारवाई होऊनही मुकुंदवाडी पोलिसांनी कोणताही धडा घेतला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news