Helicopter pre wedding shoot : प्री वेडींगसाठी अनेकांना हवे हेलिकॉप्टर

अपघात वाढल्याने लग्नांसाठी मागणी घटली; दोन ते पाच लाखांपर्यंत रवर्च
Helicopter pre wedding shoot
प्री वेडींगसाठी अनेकांना हवे हेलिकॉप्टरAI image
Published on
Updated on

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर: अलीकडे प्री वेडींग शूट करण्याचे फॅड वाढले आहे. विविध प्रेक्षणीयस्थळी किंवा गावराण लूकमध्ये प्री वेडींग शूट करण्यात येतात. यात आता वेगळा लूक देण्यासाठी प्री वेडींग शूटसाठी हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे. दरम्यान, काही काळात हेलिकॉप्टरचे झालेले अपघात पाहता लग्नांसाठी वाढलेल्या मागणीत घट झाल्याची माहिती हेलिकॉप्टर व्यावसायिक सुवोध जाधव यांनी दिली.

लग्न समारंभ अविस्मरणीय ठरवण्यासाठी अनेक जण वेगळे काही तरी करण्याची धडपड करतात. त्यासाठी करोडो रुपये मोजण्याची तयारी असते. ही क्रेज गेल्या पाच वर्षांपासून वाढीस लागली असून, यासाठी गत तीन ते चार वर्षांत हेलिकॉप्टरची मागणी वाढली होती.

Helicopter pre wedding shoot
Rajabhau Londhe murder case : रिल स्टार तरुणीसोबत २५ लाखांचा व्यवहार

दरम्यान, मागील एक ते दोन वर्षांत हेलिकॉप्टरचे झालेले अपघात पाहता यावर्षी लग्नांसाठी मागणी अद्याप झाली नाही. गत वर्षभरात सुमारे ५० ते ६० जणांनी हेलिकॉप्टर बुक केले होते. यावर्षी अद्यापही एकाचीही मागणी झाली नाही. असे असले तरी प्री वेडींगसाठी मात्र विचारणा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नांपेक्षा कमी खर्च प्री वेडींगसाठी लागत असल्यानेही अनेकांचा भर प्री वेडींगवरच आहे. लग्नासाठी सुमारे ५ लाखांचा खर्च येतो तर प्री वेडींग मात्र २ ते अडीच लाखांपर्यंत येत आहे.

अर्ध्या तासाचे शूट

प्री वेडींगसाठी अर्ध्या तासाचे शूट करण्यात येते. यासाठी हे शूट शहरात असेल तर १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजारांपर्यंत खर्च येतो. हे शूट शहराबाहेर असेल तर जाण्या-येण्याचा खर्च वाढतो. त्यामुळे २ ते अडीच लाख रुपये खर्च येतो. दरम्यान प्री वेडींग शूट झाल्यानंतर नियोजित वधू-वरांना राईडही करण्यात येणार असल्याचीही माहिती जाधव यांनी दिली.

Helicopter pre wedding shoot
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

प्री वेडींगसाठी विचारणा- अपघाताची मालिका वाढल्याने लग्नांसाठी हेलिकॉप्टर मागवणाऱ्यांची संख्या घटली आहे. यावर्षी आतापर्यंत एकही चौकशी झालेली नाही, परंतु प्री वेडींगसाठी मात्र विचारणा होत आहे. अनेकांनी तारीख निश्चित करण्याची तयारी केली आहे. मार्चनंतर प्री वेडींगसाठी हेलिकॉप्टर बुक करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

सुबोध जाधव, हेलिकॉप्टर व्यावसायिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news