Rajabhau Londhe murder case : रिल स्टार तरुणीसोबत २५ लाखांचा व्यवहार

प्राध्यापक राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरण : अटकेतील आरोपींचा पोलिसांनी मारहाण केल्याचा न्यायालयात आरोप
Rajabhau Londhe murder case
आरोपी विशाल राठोड आणि आकाश पवार दोघांना न्यायालयात हजर करताना पोलिस.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्याकडून ५० लाख रुपये उकळल्यानंतर पैसे परत मागितल्याचा कारणावरून त्यांची निघृण करण्यात आली होती. प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड आणि त्याचा दाजी आकाश पवार दोघांना मंगळवारी (दि. १७) न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी आरोपींनी पोलिसांवर मारहाणीचे आरोप केले. त्यामुळे विशेष न्यायाधीशांनी चेंबरमध्ये नेऊन तपासणी केल्यानंतर, आकाशला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत पाठवले. या प्रक्रियेत ५ तास गेले. सायंकाळी अखेर न्यायालयाने मुख्य आरोपी विशाल राठोडला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर आकाश पवारची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, लोंढे यांनी एका रीलस्टार तरुणीसोबत देखील २५ लाखाचा व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. एका गाण्यासाठी तिला पैसे दिल्याचे सूत्रांनी संगितले. त्या तरुणीची पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.

Rajabhau Londhe murder case
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

अधिक माहितीनुसार, मंगळवारी मुख्य आरोपी विशाल आणि आकाश दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी आरोपींना काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. त्यावर पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, असा दावा दोघांनी केला.

याची गंभीर दखल घेत न्यायाधीशांनी आरोपींना स्वतःच्या चेंबरमध्ये नेऊन शारीरिक तपासणी केली. विशालच्या अंगावर खुणा आढळल्या नाहीत, मात्र आकाशच्या हातावर लालसर व्रण दिसून आले. यामुळे आकाशला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत पाच तास गेले आणि अखेर सायंकाळी साडेसात वाजता सुनावणी पूर्ण झाली.

दरम्यान, उस्मानपुरा पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. अखेर पोलिस आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर आणि गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचे कलम वाढवल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. आता या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत करत आहेत. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहाय्यक लोकाभियोक्ता कैलास पवार यांनी बाजू मांडली.

त्या महिलेची चौकशी

मराठी अभिनेत्री म्हणून वावरणाऱ्या एका रीलस्टार महिलेची पोलिसांनी चौकशी केली. त्यात धक्कादायक आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. २०२४ या वर्षात प्राध्यापक लोंढे आणि या महिलेच्या बँक खात्यातून तब्बल २५ लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस आता या आर्थिक व्यवहारांचा हत्येशी काय संबंध आहे, याचा शोध घेत आहेत.

हत्येचा एक प्रयत्न फसला होता ?

मुख्य आरोपी विशाल राठोड याचे लोंढे यांच्याशी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक बाद सुरू होते. जानेवारी महिन्यात लोंढे यांना अहिल्यानगरहून परतताना मोठ्या प्रमाणात दारू पाजून संपवण्याचा कट विशालने रचला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. लोंढे यांची हत्या केल्यानंतर वाचण्यासाठी विशालने शहरातील काही नामांकित वकिलांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rajabhau Londhe murder case
Chatrapati Sambhajinagar : पादचारी रस्त्याचा राजा फक्त कागदावरच

गाण्यासाठी लोंढेंची फंडिंग, नाव विशालचे

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रा. लोंढे यांच्याकडून सुरुवातीला एका मराठी गाण्यासाठी लाखोंची फंडिंग घेतली. त्यानंतर पुन्हा एका रियालिटी शो लव्ह अँड डेअरच्या नावाखाली ५० लाख विशालने उकळले. रियालिटी शो काही झाला नाही. दुसरीकडे विशालने काही महिन्यांपूर्वी एक गाणे चित्रित केले. या गाण्याला विशालने स्वतःचे प्रोड्युसर म्हणून नावही टाकले आहे. दरम्यान, लोंढे यांनी ५० लाख परत मागताच विशालने त्यांचा काटा काढण्याचा कट रचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news