

Heavy rains lashed the district again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः संपणार संपणार म्हणणाऱ्या परतीच्या पावसाने शनिवारी (दि.१) पुन्हा जिल्ह्याला मुसळधार पावसाने रात्री उशिरापर्यंत झोडपले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसाने छत्रपती संभाजीनगरातही रात्री ९.३० च्या नंतर हजेरी लावत उशिरापर्यंत आगमन केले होते.
परतीचा पाऊस ३१ ऑक्टोबर नंतर संपणार असा दावा हवामान खात्यासह सर्वच तज्ज्ञांनी केला होता. परंतु हा दावा खोटा ठरवत १ नोव्हेंबर उजाडताच पुन्हा मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावत हा दावा खोटा ठरवला.
दरम्यान या पावसाने शनिवारी रात्री ९.३० च्या नंतर शहरात हजेरी लावली. पाऊस येताच काही काळ वीज गुल झाली होती. पावसामुळे काही काळ शहराची गती मंदावली होती. दरम्यान जिल्ह्यातील काही गावांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने तेथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
रात्री उशिराच्या पावसामुळे पूर्ण परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसामुळे पुन्हा किती नुकसान झाले याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही, परंतु परतीच्या पावसाने पुन्हा झोडपल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ