

Heavy rain in Marathwada Many villages lost contact
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्याच्या शेवटी मराठवाडयातील नांदेड, चाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाने धुमाकुळ घातला आहे. विभागातील तब्बल एक हजार ४ गावांवर अक्षरशः आभाज फाटले आहे. विभागातील सुमारे २ लाख ८० हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. पुर आगि अतिवृष्टीमुळे साडेचारशे धरांची पडझड झाली आहे. शिवार सहा माणसे आणि २०५ जनावरे दगावली आहेत.
मराठवाड्यात १४ ऑगस्टपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यात रविवारी ४९ आणि सोमवारी ३८ अशा एकूण ८७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, या मंडळांच्या हद्दीतील गावांमध्ये चोचीस तासांत सरासरी ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अतिपावामामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नांदेड, हिंगोली, धाराशिव, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिलद्वाला पाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात एकूण १ हजार ४ गावे अतिपावसामुळे बाधित झाली आहेत, यात सर्वाधिक ८४४ गावे ही एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ परनगी जिल्ह्यातील ६३, धाराशिव जिल्ह्यातील ५५ आणि हिंगोली बिल्ट्रातील २४ गावांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक गावांतील रस्ते पाण्याखाली गेल्याने गारांना संपर्क तुटला आहे. रविवारी मराठवाड्यातील तब्बल ४९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यात हिंगोली जिल्ह्यातील २२, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ आणि कालना जिल्ह्यातील दोन महसूल मंडळांचा समावेश होता त्यानंतर आज सोमवारी आणखी ३८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी म्हणने सरासरी ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
मराठवाडयातील पूरस्थिती आणि नुकसानीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरनिंगद्वारे माडावा घेतला यावेळी त्यांनी नुकसानीचे वाहहीने पंचनामे करण्याचे आणि सर्व स्थलांतरित व्यक्तींसाठी आरोग्याची, राहण्याची व्यवस्था करण्याचे तसेच गरजेनुसार शाळा कॉलेजांना सुट्टी देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाम्यांना दिल्या
सलग पावसामुळे शेतीतील पिकांचे अत ोनात नुकसान झाले आहे. मराठवाडयात जिरायती आणि बागायती मिळून एकूण २ लाख ८० हजार हेक्टरवरील पिके कष्ट झाली आहेत. यात एकट्या नदिट जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ३१ हेक्टर इतके नुकसान इशाले आहे. यासोबतच परभणी जिल्ह्यातही २१ हजार आणि पाराशिय जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
मराठवाडयात पावसामुळे ४५७परांची पडझड झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात २४४ घरांची, परभणी जिल्ह्याর ৩৬ घरांची, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३ घरांची, धाराशिव जिल्ह्यात ५३ घरांची, लातूर जिल्ह्यात ११ मरांची आणि बीड जिल्ह्यात ४ परांची पड़वाड शाली आहे.
पूर आणि पावसामुळे नचिड जिल्ह्यात ३. बीड जिल्ह्यात २ आणि हिंगोली जिल्ह्यात एक अशा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर नदिड जिल्ह्यात एक जण जखमी झाला आहे. गासोबतच विभागात लहान-मोठी २०५ जनावरे दगावली आहेत. पात सर्वाधिक १०५ जनावरे नांदेड जिल्ह्यात दगावली आहेत. तर चाराशिव जिल्ह्यातही ५३ जनावरांचा बळी गेला आहे. परभणी जिल्ह्यात २१ बनाने, हिंगोली जिल्ह्यात १६ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.