

Devendra Fadnvis | Chief Minister Devendra Fadnavis in Paithan taluka on 19th
पैठण :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उद्या मंगळवारी दि.१९ रोजी फारोळा ता. पैठण येथील जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन उद्घाटन करणार असल्याने जिल्हा पोलीस यंत्रणाने सोमवार रोजी प्रभारी पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या उपस्थितीत आगाऊ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन तयारीला लागले आहे पण मुख्यमंत्री कुठं कुठं भेट देणार या चर्चेचा विषय तालुक्यात झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने पैठण तालुक्यातील फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या शुभारंभासाठी मंगळवारी दि.१९ रोजी सायंकाळी पाच वाजता दौऱ्यावर येणार आहेत. सोमवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, सपोनि निलेश शेळके यांच्यासह गुप्तचर विभाग, वाहतूक शाखा, वैद्यकीय सेवा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग या विविध पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आगाऊ सुरक्षाव्यवस्थाचा आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पैठण तालुक्यात कुठे कुठे भेट देणार यासंदर्भात चर्चेचा विषय सुरू झालेला आहे.