Sambhajinagar News : जिल्हा परिषदेच्या फर्निचर निविदेवरून सभेत खडाजंगी !

निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच एल-१ ठरविण्याच्या प्रस्तावावर आक्षेप
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्हा परिषदेच्या फर्निचर निविदेवरून सभेत खडाजंगी !file photo
Published on: 
Updated on: 

Heated exchange in the meeting over the Zilla Parishad furniture tender!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील फर्निचर आणि अनुषंगिक कामांच्या १४ कोटींच्या खर्चाचा विषय शुक्रवारी (दि २०) सर्वसाधारण सभेत गाजला. तब्बल १३ कोटी ८८ लाख २५ हजार रुपयांच्या कामासाठी सर्वात कमी दराच्या (एल-१) निविदेला मान्यता देण्याचा ठराव सभेत मांडण्यात आला. मात्र, निविदा प्रक्रियाच पूर्ण झाली नसताना एल-१ मंजुरीचा प्रस्ताव कसा, असा सवाल उपस्थित करीत शिंदेसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी ठरावाला विरोध केला. यामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.

Sambhajinagar News
Professor Recruitment : प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बंधनकारक

अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत हा विषय चर्चेला आला. निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच सर्वात कमी दराची निविदा निश्चित करणे चुकीचे असून, यामुळे सभागृहाची दिशाभूल होत असल्याचा आरोप पठाडे यांनी केला. दरांची माहिती नसताना मंजुरी कशी द्यायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नवीन इमारतीचे काम आणखी लांबू नये आणि निवडणूक आचारसंहितेत अडकू नये, अशी भूमिका घेत संजय निकम, पंकज ठोंबरे यांसह आदी सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दिला. कोणताही गैरप्रकार होणार नसून संबंधित निविदा कार्योत्तर मान्यतेसाठी पुढील सभेत ठेवण्यात येईल, असे अध्यक्ष गलांडे यांनी स्पष्ट केले.

Sambhajinagar News
Health Department Recruitment : महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी भरती वादाच्या भोवऱ्यात

साडेचार महिन्यांपासून प्रक्रिया रखडली

३० जूनच्या सभेत फर्निचरसाठी उपकरातून १४ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, साडेचार महिन्यांनंतरही तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रशासनाने एवढे दिवस काय केले, असा सवाल सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला. यावर तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला असून, लवकरच मंजुरी मिळेल, असे कार्यकारी अभियंता किरण धनके यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.