Professor Recruitment : प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बंधनकारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी विद्यापीठाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे.
Professor Recruitment
Professor Recruitment : प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बंधनकारकfile photo
Published on: 
Updated on: 

CCTV recording of interviews for professor recruitment is mandatory

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी विद्यापीठाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून ते अंतिम निवड यादी जाहीर करण्यापर्यंतची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, मुलाखतीचे संपूर्ण चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Professor Recruitment
Sambhajinagar News : एसबीआय बँकेकडे गहाण ठेवलेली १.८१ कोटींची मशिनरी परस्पर विकली

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संबंधित संस्थेला शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्राप्त झालेल्या अर्जाची नोंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल.

पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्याची प्रत विद्यापीठाला द्यावी लागणार आहे. संपूर्ण मुलाखत प्रक्रिया सीसीटीव्ही प्रणालीद्वारे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड केली जाणार आहे. हे रेकॉर्डिंग किमान एक वर्ष सुरक्षित ठेवावे लागणार आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Professor Recruitment
Sambhajinagar News : 'नो' नेटवर्कमधील कामांचा मजुराअभावी मंदावला वेग

पात्रतेसाठी नेट-सेट, पीएच.डी. आवश्यक

सहायक प्राध्यापक पदासाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच नेट, सेट आवश्यक आहे. नियमांनुसार पीएच.डी. धारक उमेदवारांना सूट लागू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.