Sambhajinagar News : ही काय भारत-पाकची बॉर्डर आहे का ?

आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांत खडाजंगी, कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमावर व्हायरल
Sambhajinagar News
Sambhajinagar News : ही काय भारत-पाकची बॉर्डर आहे का ?file photo
Published on
Updated on

Heated exchange between two RTO officials; call recording goes viral on social media

नितीन थोरात

वैजापूर : आरटीओ विभागातील कथित नियमबाह्य वसुली आणि अधिकारक्षेत्राच्या वादावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या तीव्र शाब्दिक चकमकीचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या प्रकारामुळे विभागात खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar ZP : जि.प. आरोग्य विभागाचा उडाला बोजवारा !

व्हायरल झालेल्या कथित संभाषणात वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून दोन्ही अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना ऐकू येतात. कारवाईच्या हद्दीबाबत आक्षेप घेत एका अधिकाऱ्याने, "ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही," असे म्हणत नाराजी व्यक्त केल्याचे संभाषणात ऐकायला मिळते.

या संभाषणात एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून बाहेरील भरारी पथक वैजापूर हद्दीत येऊन कथित वसुली करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : निविदा मागे घेण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबाव

दरम्यान, व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगमुळे आरटीओ विभागातील अंतर्गत संघर्ष, अधिकारक्षेत्राचा वाद आणि कथित वसुलीच्या आरोपांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिकारी नॉट रिचेबल

दरम्यान, संबंधित संभाषण व्हायरल झाल्यानंतर याची खातरजमा करण्यासाठी वैजापूर आरटीओ कार्यालयाचे प्रमुख गणेश विघ्ने तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news