Chhatrapati Sambhajinagar crime : चोरट्यांचा हसूलमध्ये सुळसुळाट; २ घरांत चोरी

नागरिकांत भीतीचे वातावरण; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : सातारा पोलिस ठाणाच्या हद्दीत घरफोडीचे लोन आता हर्मूल भागातही पसरले आहे. जमनज्योती रोडवर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, गेल्या तीन दिवसांत दोन घरे फोडून रोखसह दागिने लंपास केले. याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत फिर्यादी दीपक शामराव निकाळजे (४३, रा. साई प्रोव्हिजनच्या पाठीमागे, जमनज्योती रोड, हर्मूल) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाजीपाला व कटलरीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते कुटुंबासह एका पाहुण्यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री १२ वाजेच्या सुमारास ते घरी परतले. मात्र,यावेळी त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला.

Crime News
Sambhajinagar Crime : १३ वर्षे तपासात दिरंगाई, ५० तक्रारी, तरीही न्याय नाही; फिनिक्स क्लासेसच्या संचालकाने जीवन संपवले

त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, भांड्यांच्या रॅकमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या डब्याचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी या डब्यात ठेवलेली २४ हजार १५० रुपयांची रोख रक्कम, १३ हजारांचे दोन ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट व अडीच तोळ्याची जोडवी असा ४३ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तसेच पांढऱ्या रंगाच्या धातूची एक अंगठी आणि पायातील चेनही चोरीला गेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार नंदलाल चव्हाण करत आहेत.

आजारी मुलासाठी दरवाजा उघडा ठेवला अन् संदूक पळवली

दुसरी घटना याच परिसरात ५ ते ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. शेतकरी विष्णू भाऊसाहेब औताडे (३५) यांचा एक वर्षाचा मुलगा आजारी होता, त्याला ताप व उलट्या होत होत्या. त्यामुळे विष्णू यांच्या पत्नीने किचनचा पाठीमागील दरवाजा उघडा ठेवून मध्यरात्री सव्वाबारा वाजता झोप घेतली. याचाच फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar investment : लुब्रिझोलच्या एक्झिटमुळे रिक्त भूखंडावर पाच कंपन्यांकडून गुंतवणूक

रात्री दीड वाजेच्या सुमारास मुलगा रडू लागल्याने पत्नीला जाग आली, तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. चोरट्यांनी पलंगाखाली ठेवलेली लोखंडी पेटी (संदूक) पळवली होती. या पेटीत १५ ग्रॅमची सोन्याची एकदानी, ३ ग्रॅमच्या बाळ्या, गळ्यातील ओम आणि १५ ग्रॅमचे चांदीचे कडे असा ८४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक उपनिरीक्षक अशोक जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news