Chhatrapati Sambhajinagar investment : लुब्रिझोलच्या एक्झिटमुळे रिक्त भूखंडावर पाच कंपन्यांकडून गुंतवणूक

२,७६५.१२ कोटी रुपयांचे प्रकल्प, सुमारे २,४५० प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी
Buildings
BuildingsPudhari File Photos
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : लुब्रिझोल कंपनीच्या 'एक्झिट' मुळे रिकामी झालेल्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील १२० एकर जागा ही आता इतर उद्योगांसाठी मोठी संधी ठरली आहे. हा रिक्त भूखंड मिळवण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये चढाओढ लागली असताना जेएसडब्ल्यू, गोदावरीसह इतर ३ अशा एकूण ५ कंपन्यांनी २,७६५.१२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बाजी मारली आहे. त्यांच्या प्रकल्पांद्वारे सुमारे २,४५० प्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जुलै २०२४ मध्ये 'लुब्रिझोल' कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करार (एमओयू) करून बिडकीन येथे १,९१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि २०० रोजगारांचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, व्यावसायिक धोरणातील बदलांमुळे कंपनीने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कॉस्मो फिल्म्स आणि रुचा इंजिनिअरिंगच्या लगत असलेला हा अत्यंत मोक्याचा भूखंड मोकळा होताच १०० पेक्षा जास्त उद्योजक तो मिळवण्यासाठी शर्यतीत आले होते.

Buildings
Chhatrapati Sambhajinagar crime : चलती क्‍या? म्‍हणत तरुणीचा भररस्‍त्‍यात विनयभंग

अखेर या जागेवर ५ मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक निश्चित केली आहे. यात जेएसडब्ल्यू मोटर्सकडून सर्वाधिक ४९.९१ एकर भूखंडावर ६०० कोटीची गुंतवणूकीतून ६५० रोजगार मिळणार आहे. तर गोदावरी पॉवर अँड इस्पात लि., ३१.४५ एकर जागेवर १,५०० कोटींची गुंतवणूक आणि ५०० जणांना रोजगार मिळणार आहे.

यासह धूत ट्रान्समिशनकडून २०.०१ एकरवर १५० कोटीची गुंतवणूक आणि ६०० रोजगार, गुरू सेवा प्रमोटर्स १०.०३ एकरवर ३३५ कोटींचा प्रकल्पातून ५०० रोजगार आणि सुप्रिम नॉनवोव्हन इंडस्ट्रीज १० एकर जागेवर १८०.१२ कोटींच्या प्रकल्पातून २०० जणांना रोजगार मिळणार आहे.

Buildings
Eknath Shinde : मोदी सरकारची लोकप्रियता विरोधकांना सहन होत नाही

८५१ कोटींची गुंतवणूक अन् १,५५० रोजगार अधिक

लुब्रिझोलच्या प्रस्तावित प्रकल्पात १,९१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि २०० रोजगारांचे उद्दिष्ट ठेवले होते. या तुलनेत या नव्या ५ उद्योगांमुळे तब्बल ८५१ कोटी रुपये अधिक गुंतवणूक आणि १,५५० अधिक रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news