Smart Parking Gujarat Model : शहरात लवकरच स्मार्ट पार्किंगचा गुजरात मॉडेल

पार्किंगसाठी ॲडव्हान्स बुकिंग : पोलिस आयुक्त, मनपा बैठकीत निर्णय
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शहरात लवकरच स्मार्ट पार्किंगचा गुजरात मॉडेल File Photo
Published on
Updated on

Gujarat model of smart parking soon in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहरात लवकरच गुजरात मॉडेलच्या धर्तीवर स्मार्ट पार्किंग सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.६) पोलिस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar News
संतापजनक : पुन्हा एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षाचालकाने टाकला हात, शहरातील शालेय विद्यार्थिनी असुरक्षित

ही पार्किंग पीपीपी तत्वावर राबवण्यात येणार असून, यासाठी राखीव पार्किंग, शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयांची जागा तसेच रोडलगतच्या जागेचा वापर करण्याचे धोरण अंवलंबण्यात येणार आहे. याबैठकीला महापालिकेचे सनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे, उप अभियंता लोखंडे पाटील, सहाय्यक आयुक्त अशोक गिरी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. या समस्येवर महापालिकेकडून गुजरातमधील अहमदाबाद शहरात राबवण्यात येत असलेल्या मस्मार्ट पार्किंगफचे धोरण अंवलंबले जाणार आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime : इंस्टाग्रामवरील फ्रेंडने दहावीच्या मुलीला फूस लावून पळविले

यासाठी महापालिकेकडून शहरातील राखीव पार्किंगसह विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी ऑफीसच्या जागेचा वापर करण्यात येणार असून रोडलगतच्या जा-गेचाही वापर केला जाणार आहे. यासाठी एक अॅप तयार केले जाणार आहे.

यामुळे वाहनचालकांना पार्किंग जागा शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे अनावश्यक फिरणे टळणार असून इंधन आणि वेळेचीही बचत होणार आहे. यासह काहीप्रमाणात वाहातुक कोंडींची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. प्रत्येक ठिकाणच्या पार्किंगमध्ये मनपाकडून सीसीटीव्ही कॅमेरे व लाईटची व्यवस्था केली जाणार आहे. त्याची देखभाल दुरुस्ती व त्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिलही मनपा भरणार आहे. तसेच दुकानांसमोरची पार्किंग व्यवस्था व्यावसायिक

दिवसा महिला कर्मचाऱ्यांकडे व्यवस्थापन

या कामासाठी दिवसा महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, पार्किंग व्यवस्थापन आणि शिस्त राखण्याचे काम महिलाच करतील. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होईल तर रात्रपाळीत ही जबाबदारी पुरुषांकडे असणार आहे.

रिक्षांसाठी वेगळी मार्किंग

स्मार्ट पार्किंगमध्ये शहरातील रिक्षा पार्किंगसाठी विशेष मार्किंग करण्यात येणार आहे. तर शहरातील नो पार्किंग झोन लवकरच घोषित केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news