धाराशिव-बीड-संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गास हिरवा कंदील

रेल्वे मंत्रालयाकडून सर्वेक्षणास मंजुरी; डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू
sambhajinagar news
धाराशिव-बीड-संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गास हिरवा कंदीलfile photo
Published on
Updated on

Green light for Dharashiv-Beed-Sambhajinagar new railway line

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर (सुमारे २४० कि.मी.) या नवीन रेल्वेमार्गाचे डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

sambhajinagar news
Hingoli Farmers Protest | 'अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करा'; शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर राज्य शासनाशी आवश्यक चर्चा, नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि इतर संबंधित संस्थांच्या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर निर्णय घेतला जाईल. रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही विविध तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय टप्प्यांमधून पार पडणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हा रेल्वेमार्ग केवळ तीन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प नसून, मराठवाड्याच्या भविष्यातील आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. संभाजीनगर हे राज्यातील वेगाने विकसित होणारे औद्योगिक, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स केंद्र बनत असताना या रेल्वेमार्गामुळे बिडकीन औद्योगिक वसाहत रेल्वे मॅपवर येईल.

sambhajinagar news
Farmer protest Hingoli : कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

औद्योगिक विकासाची वाट सुकर

विशेषतः ऑरिक, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ऑटोमोबाईल, ईव्ही, अभियांत्रिकी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना या मार्गाचा मोठा फायदा होऊ शकतो. कंटेनर, औद्योगिक कच्चा माल, तयार उत्पादने तसेच कृषी उत्पादनांची वाहतूक अधिक जलद, कमी खर्चात आणि कार्यक्षम पद्धतीने करता येईल. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल. तसेच या रेल्वेमार्गामुळे मराठवाड्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल. शिक्षण, रोजगार, व्यापार आणि आरोग्य सेवांसाठी होणाऱ्या दैनंदिन प्रवासालाही मोठी मदत मिळेल.

मालवाहतुकीसाठी कार्यक्षम नेटवर्क

याशिवाय, भविष्यात हा मार्ग उत्तर-दक्षिण रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वपूर्ण भाग बनण्याची क्षमता आहे. संभाजीनगरला दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पुढे दक्षिण भारताशी अधिक थेट रेल्वे जोडणी उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रवाशांसाठी कमी अंतराचे आणि पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध होतील, तर मालवाहतुकीसाठीही अधिक कार्यक्षम रेल्वे नेटवर्क तयार होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news