Accident News : खड्यामुळे दोन महिन्यांत तिसरा बळी; टेम्पोखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

करमाड-लाडसावंगी मार्गावरील घटना, चालक फरार
Accident News
Accident News : खड्यामुळे दोन महिन्यांत तिसरा बळी; टेम्पोखाली चिरडून वृद्धेचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

Gravel kills third in two months; Old man dies after being crushed under a tempo

करमाड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड-लाडसावंगी मार्गावरील दुधड गावाजवळ गुरुवारी (दि.६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ७९ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकी खड्यात गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर पडलेल्या वृद्ध महिलेला समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने चिरडल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासह पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Accident News
Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आता राज्यभरातून करता येणार अर्ज

छायाबाई पुंडलिक भिसे (रा. निमखेडा, ता. फुलंब्री) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छायाबाई भिसे या भांबर्डा येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी आल्या होत्या. अंत्यविधीनंतर त्या भरत दगडू सोळुंके (५५, रा. भांबर्डा) यांच्या दुचाकीवरून (एमएच २० एफडब्ल्यू २०८०) निमखेड्याकडे निघाल्या होत्या.

दुधड गावाजवळील खड्ड्यात दुचाकी गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यात चालक एका बाजूला, तर छायाबाई भिसे विरुद्ध दिशेला रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांना चिरडले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या, तर भरत सोळुंके जखमी झाले.

Accident News
Crime News : वीज कर्मचाऱ्यावर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातखडे यांनी जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दुपारी छायाबाई भिसे यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवावर निमखेडा येथे उशिरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार शिवाजी मदेवाड पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, करमाड-लाडसावंगी मार्गावरील खड्यांमुळे गेल्या दोन महिन्यांत तिसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या धोकादायक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून अपघातांची मालिका थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news