Crime News : वीज कर्मचाऱ्यावर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

बाजार सावंगी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना उघडकीस आली आहे.
sambhajinagar news
Crime News : वीज कर्मचाऱ्यावर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Crime News: Electricity department employee attacked; case registered against three

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : बाजार सावंगी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात विकास गंभीरराव कापसे यांच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar news
Solid Waste Management : १०० किलोपेक्षा जास्त आस्थापनांचा कचरा मनपा उचलणार नाही

तक्रारदार विष्णू कोंडीराम वाकळे (वय २५, रा. राभडजी, ता. खुलताबाद) हे नोव्हेंबर २०२२ पासून महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (दि. चार) सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाल्यानंतर, दुपारी २:३० वाजेच्या सुमारास दरेगाव पाडोळी येथे वीज दुरुस्तीचे काम संपवून ते बाजार सावंगी सबस्टेशन कार्यालयात परतले होते. दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास काही लोक सबस्टेशन कार्यालयात आले.

त्यातील एका जणाने तुमच्यातील विष्णू वाकळे कोण आहे?" अशी विचारणा केली. वाकळे यांनी स्वतःची ओळख पटवून दिली असता, त्या व्यक्तीने मी विकास गंभीरराव कापसे आहे असे सांगून अचानक त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

sambhajinagar news
Dangerous Building : गुलमंडीतील शंभर वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त

कॉलर पकडून मारहाण व धमकी विकास कापसे याने मी जिल्हा परिषद सदस्य आहे, माझा फोन का उचलला केले. इतर नाही? असे म्हणत विष्णू वाकळे यांची गच्ची व शर्टाची कॉलर पकडली. तसेच मारहाण केली. यावेळी कापसे याने कार्यालयातील शासकीय ओळखपत्र (ID) ओढून तोडून टाकले. या दरम्यान त्याच्यासोबत आलेल्या अन्य अनोळखी व्यक्तींनी वाकळे यांना पकडून ठेवले, तर एकाने तूसबस्टेशनच्या बाहेर कसा येतो तेच बघतो, अशी धमकी दिली. तसेच तिसऱ्याने या सर्व घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण दरम्यान, सबस्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून विकास कापसे व त्याच्या साथीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर ते तेथून निघून गेले. मारहाणीत छातीला मार लागल्याने वाकळे यांना सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय, खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी खुलताबाद पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. दरम्यान, या घटनेप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी विकास गंभीरराव कापसे (रा. धामणगाव) व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नवनाथ भाऊसाहेब कोल्हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news