छ. संभाजीनगर | अल्पवयीन नातीवर बलात्कार; आजोबाला सक्तमजुरी, शेजाऱ्याला जन्मठेप, DNA ठरला महत्त्वाचा पुरावा

आजोबा-नातीच्या नात्याला काळीमा, तिघांमध्ये अल्पवयीन बालकाचा होता समावेश
Rape case News
नातीवर अत्याचार केल्याप्रकरणी आजोबाला सक्तमजुरीची शिक्षा तर शेजाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा File Photo

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर शेजाऱ्यासह आजोबाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर न्यायालयात गुरुवारी (दि.४) सुनावणी झाली. याप्रकरणी शेजार्‍याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप आणि २६ हजाराच्या दंडाची शिक्षा तर नातीवार अत्याचार करणाऱ्या आजोबाला दहा वर्षे सक्तमजूरी आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी ठोठावली आहे.

Rape case News
इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणीवर हॉटेल मालकाचा अत्याचार!

पैठण तालुक्यातील १४ वर्षीय पीडिता मे २०१८ मध्ये शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे घरात एकटी होती. तिचे आई-वडील आणि दोन बहिणी कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. याचकाळात २४ वर्षीय शेजाऱ्याने पीडितेला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिच्यावर चार ते पाचवेळा बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करताना पीडितेने नकार दिला. तेव्हा शेजाऱ्याने मी तुझ्या घरी येईन अशी धमकी देत पुन्हा बलात्कार केला. पुढे गावातच राहणार्‍या पीडितेच्या नातेवाईक अल्पवयीन मुलाने तिच्यावर बलात्कार केला. या घटना घडत असतानाच मे महिन्यातच आजोबाने देखील तिला घरात एकटी असल्याची संधी साधून चाऊमिन खाऊ घालत बलात्कार केला.

Rape case News
आनंदवन हत्या प्रकरण : 'त्या' तरूणीचा बलात्कार करून केली हत्या !

पोट दुखू लागल्याने प्रकार उघडकीस

या घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याच्या चार दिवस अगोदर पीडितेचे अचानक पोट दुखू लागले. ही बाब पीडितेने आई-वडीलांना सांगितली. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी पीडितेला एका खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी नेण्यात आले. तेव्हा ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. आई-वडीलांनी याबाबत विचारपूस केल्यावर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर बिडकीन पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Rape case News
हमारे बारह फेम अदिती धीमन| ‘मला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या..’

डीएनए तपासणीचे पुरावे सादर

या खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे खटल्यादरम्यान पीडितेने एका मुलाला जन्म दिला. डीएनए तपासणीच्या अहवालावरून शेजाऱ्याचा डीएनए जुळला. सुनावणीअंती न्यायालयाने शेजाऱ्याला भादंवी कलम ३७६(२) अन्वये नैसर्गिक मृत्यूपर्यंत शिक्षा, २५ हजारांच्या दंडासह कलम ५०६ अन्वये १ वर्षांचा कारावास आणि १ हजार रुपयांचा दंड तर आजोबाला भादंवी कलम ३७६ (२) (एन) नुसार १० वर्षांचा कारावास, २५ हजारांचा रुपयांचा दंड, अल्पवयीन बालकाला कलम ३७६ (२) (एफ) नुसार १० वर्षांचा कारावास आणि २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक एस. बी. वाघमारे, जमादार एस. जी. घुगे आणि अंमलदार सनी खरात यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news