इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणीवर हॉटेल मालकाचा अत्याचार!

file photo
file photo

केज (बीड), पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी जात असलेली २० वर्षीय तरुणीवर ती पाणी पिण्यासाठी एका हॉटेलवर गेली असता तिचा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्याने एका हॉटेल चालकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ११ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील एक वीस वर्षीय घटस्फोटित तरुणी ही केज येथील तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला केजकडे जात होती. दरम्यान, ती पाणी पिण्यासाठी माळेगाव चौकाच्या जवळ असलेल्या हॉटेल संकेतमध्ये गेली. तेथे पाण्याची बॉटल न मिळाल्याने ती माळेगाव चौकात गेली. तेवढ्यात संकेत हॉटेलमधील विकास गोरे हा तिच्या पाठीमागे आला. त्याने तरुणीला काही अडचण आल्यास माझ्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले. त्यावर त्या तरुणीने आपल्या मोबाईलचे चार्जिंग संपल्याचे सांगितले. यानंतर विकास गोरेने माझ्या हॉटेलवर जाऊ तिथे तुझा मोबाईल चार्जिंग करून देतो, असे म्हटले. तरुणीने विकासवर विश्वास ठेवला आणि ती तिच्या हॉटेलवर गेली तिथे आपला मोबाईल चार्जिंगला लावला. त्यावेळी ती हॉटेलच्या मागील भागात बसली. थोड्यावेळाने विकास हा तरुणीच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या हाताला धरून ओढले. तिच्या इच्छे विरुद्ध तिच्यावर बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती पीडित तरुणी कळंब येथे गेली व रात्रभर ती कळंब येथील बस स्टँडवर थांबली.
त्या नंतर पुन्हा दि. बुधवारी १२ जून रोजी दुपारी १२:३० वा. विकास गोरे कळंब येथील बस स्टँडवर गेला आणि त्या तरुणीला भेटला. त्याने तिला बस स्टँडचे बाहेर बोलावून घेतले. तिला मोटार सायकल बसवून तिला येरमाळा येथील उड्डाण पुला जवळ सोडून निघून गेला. गुरुवारी १३ जून रोजी पीडित तरुणी येरमाळा येथून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आली. तिने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तिच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात विकास गोरे याच्या विरुद्ध भा दं. वि. ३७६ (१) व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित तरुणीची फरफट

पीडित तरुणी ही बुधवारी १२ जून रोजी येरमाळा पोलीस स्टेशन येथे गेली. तिने घडलेला प्रकार तेथील पोलीस कर्मचाऱ्याला सांगितला. येथे गुन्हा दाखल करून तपास युसुफवडगाव पोलिसांच्याकडे वर्ग करणे अपेक्षित असताना येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता ही घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तेथे चौकशीसाठी जाण्यास सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी मिळेल त्या वाहनाने युसुफवडगाव पोलीस स्टेशनला आली.

इन्स्टाग्रामने घात केला!

अवघ्या दोनच महिन्यापूर्वी सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवरून पीडित तरुणीची ओळख ही केज येथील एका मुलीशी झाली होती. या इन्स्टाग्राम मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना हा प्रसंग घडला. पीडित तरुणीला एक लहान मुलगी असून ती पतीपासून विभक्त राहात आहे. तसेच तिचे आईवडील देखील विभक्त राहत असल्याने पीडितेची मुलगी ही तिच्या आजीकडे असते.

संशयीत आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी

गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी पोलीस उपनिरक्षक प्रकाश शेळके यांनी अवघ्या तीन तासात संशयीत आरोपी विकास गोरे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news