The accused ordered a knife online
हत्येसाठी आरोपीने ऑनलाईन चाकू मागवल्याची माहिती समोर आली आहे.Pudhari File Photo

आनंदवन हत्या प्रकरण : 'त्या' तरूणीचा बलात्कार करून केली हत्या !

तरुणीच्या हत्येसाठी आरोपीने ऑनलाईन मागवला चाकू धक्कादायक माहिती समोर
Published on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : वरोरा येथील आनंदवनात 24 वर्षीय तरुणीच्या प्रेमप्रकरणातून खून झाल्याची घटना रविवारी (दि.26) उघडकिस आली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने तरूणीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची माहिती चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली आहे. या बरोबरच रविवारी (दि.30) संशयित आरोपी समाधान कोळीने वरोरा पोलिस ठाण्याच्या कोठडीत शौचालयामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. तरुणीच्या हत्येसाठी आरोपीने ऑनलाईन चाकू मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

घटनेच्या दिवशी 26 जूनला त्या तरूणीचे आई वडील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे जात असल्याबातच माहिती आरोपीला अगोदरच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी त्या तरूणीच्या घरी गेला. सशंयीत आरोपीने त्या तरूणीवर बलात्कार केला, त्यानंतर तिच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार करुन हत्या केली. या प्रकरणात वापलेला चाकू ऑनलाईन मागवला असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. यावेळी आरोपीने या हत्येबद्दल कबुली जबाब देखील पोलिसांना दिला आहे त्यामुळे शनिवारी (दि.29) संशयित आरोपीवर खुनासोबत बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

The accused ordered a knife online
चंद्रपूर : वरोरा पोलिस ठाण्यातील कोठडीत आरोपीने जीवन संपवले

गार्ड नसतानाच आरोपीने केली आत्महत्या

आरोपीने कोठडीच्या जवळ ठेवलेल्या बुटातील लेस काढून शौचालयाच्या दरवाज्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे या घटनेची माहिती सिआयडीला एकापत्राद्वारे देण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. शिवाय या घटनेची माहिती मृतकाच्या कुटूंबियांना देण्यात आली आहे. चंद्रपूरात आल्यानंतर त्याचे कुटूंबियांच्या परवानगी नंतर मृतदेह सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news