Sambhajinagar News : काहींचे स्वप्न उजळले तर काहींचे झाकोळले

सिल्लोड : १०४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत, ५३ ग्रामपंचायतींत महिलाराज
Sambhajinagar News
Sambhajinagar News : काहींचे स्वप्न उजळले तर काहींचे झाकोळलेFile Photo
Published on
Updated on

Gram Panchayat Sarpanch reservation

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि.७) काढण्यात आली. तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आली.

Sambhajinagar News
Sambhajinagar Encroachment Campaign : धनदांडग्यांच्या मालमत्तांची अखेर मार्किंग

ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत खालील प्रमाणे एससी सर्वसाधारण चांदापूर, खंडाळा, पिरोळा- डोईफोडा, पिंपळदरी, बाभूळगाव. एससी महिला- गोळेगाव बु., म्हसला बु., जळकीघाट-बोजगाव, रेलगाव, उपळी. एसटी सर्वसाधारण जांभई, मांडणा, डिग्रस, भवन, एसटी महिला- बोरगाव बाजार, वरुड पिंप्री, निल्लोड, अजिंठा, वडाळा. ओबीसी

महिला : गोळेगाव खु-पानस काजीपूर, सावखेडा खु. बु., देऊळगाव बाजार, खातखेडा, वाघेरा-नाटवी, टाकळी जीवरग, बाळापूर, चारनेर- चारनेरवाडी, पिंपळगाव पेठ, धारला, घटांम्ब्री, दौडगाव, आसडी, खुपटा.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : बालगृहातील छळ; महिला आयोगाकडून गंभीर दखल

ओबीसी सर्वसाधारण : खुल्लोड- वीरगाव, वांगी खुर्द, गव्हाली तांडा, म्हसला खुर्द, मंगरुळ, गेवराई सेमी, शिवना, आमठाणा, चिंचपूर, टाकळी खुर्द, खेडी लिहा, शिंदेफळ, रहिमाबाद, नानेगाव. ओपन सर्वसाधारण हट्टी मोहोळ, धावडा-चिंचवन, पालोद, धोत्रा, मादणी-वडाळी, अंभई, लिहाखेडी, घाटनांद्रा, सारोळा, कायगाव, मोढा बु., धानोरा वांजोळा, अंधारी, गव्हाली, अनाड, वरखेडी-भायगाव, बोरगाव कासारी, सासुरवाडा, आमसरी, जळकी वसई, दहिगाव, केळगाव- आधारवाडी, पानवडोद बु., वांगी बु., सिसारखेडा, बोरगाव सारवानी, मांडगाव, वडोदचाथा.ओपन महिला : जळकी बाजार, पांगरी, वसई-जळकी, उंडणगाव, कासोद- धामणी, तळणी, पानवडोद खु., सराटी, बहुली, मुखपाट, पेंडगाव, पळशी, केन्हाळा, मोढा खु., लोणवाडी, कोटनांद्रा, चिंचखेडा, बनकिन्होळा, पिंत्री- वरुड, जंजाळा, हळदा- डकला, सिरसाळा, अन्वी, पिंपळगाव घाट- शेखपूर, भराडी, बोदवड, सिरसाळा तांडा, डोंगरगाव, तलवाडा. आरक्षण सोडतीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक सतीश ताठे, माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, रघुनाथ तायडे, राजेंद्र ठोंबरे, अनिल खरात, रवी काळे, प्रभाकर वाघ, नारायण बडक, काकासाहेब बडक, अक्षय मगर, सलीम पठाण यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

सोडतीत कही खुशी कही गम तालुक्यातील अंधारी ग्रामपंचायत ओबीसीकडून ओपन सर्वसाधारणसाठी आरक्षित झाली. तर शिवणा, गव्हाली तांडा या ग्रामपंचायती ओपनकडून ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव झाली. तर घाटनांद्रा ग्रामपंचायत महिला राखीवमधून आता सर्वसाध- ारणसाठी राखीव झाली आहे. तर पळशी, केव्हाळा, मोढा खुर्द, लोणवाडी, कोटनांद्रा या ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जैसे थे राहिले आहे.

अंधारीला लॉटरी, शिवण्यातील इच्छुकांचे स्वप्न भंगले तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या अंधारी ओबीसीकडून ओपनकडे गेल्याने इच्छुकांना लॉटरी लागली आहे. तर मिरचीची मोठी बाजार पेठ असलेली शिवणा ग्रामपंचायत ओपनकडून ओबीसी आरक्षित झाल्याने इच्छुकांचे स्वप्न भंगले आहे. तर अजिंठा, बोरगाव बाजार, भवन या मोठ्या ग्रामपंचायतीही आरक्षित झाल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

यांचे चेहरे खुलले

प्रमुख नेतेमंडळी जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, श्रीराम पा. महाजन, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, पंचायत समिती माजी सभापती श्रीरंग पा. साळवे, ज्ञानेश्वर पा. तायडे, लताबाई दादाराव वानखेडे, डॉ. कल्पना संजय जामकर, विजय आबा दौड, अशोक गरुड, भाजपाचे ज्ञानेश्वर पा. मोठे, सुनील मिरकर, शिव-सेनेचे मारुती पा. वराडे, अशोक सूर्यवंशी, अरुण बंडू पा. शिंदे, राष्ट्रवादीचे ठगणराव पा. भागवत, दत्तात्रय पा. पांढरे, राहुल ताठे, अजित पाटील, राधाकृष्ण पा. काकडे आदींचे सोयीने सरपंचपद सुटल्याने त्यांचे आरक्षण सोडतील नशीब उजळले आहे.

यांच्याकडे राहणार लक्ष

तालुक्यातील माजी आ. सांडू पाटील लोखंडे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे इद्रिस मुलतानी, कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पा. बनकर, अरुण काळे, शिवसेनेचे देविदास पा. लोखंडे, सत्तार बागवान, सय्यद नासिर हुसेन, दुर्गाताई पवार, माजी उपसभापती अजीज बागवान, मच्छिद्र पालोदकर, करीम चेअरमन, राष्ट्रवादीचे देविदास पा. आमटे अनेक नेत्यांच्या गावांचे सरपंच पद त्यांच्या सोयीने न सुटल्याने त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीत उतरणे अवघड झाले असले तरी ते कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news