Sambhajinagar News : जीपीए धारकाने दीड एकर जमीन परस्पर विकली

जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची सतर्कता
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जीपीए धारकाने दीड एकर जमीन परस्पर विकलीfile photo
Published on: 
Updated on: 

GPA holder sold 1.5 acres of land without authorization

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धरमपूर-शरणापूर येथील एका अल्प भूधारक शेतकऱ्याची वर्ग २ मध्ये मोडणारी शेत जमिन वर्ग १ करून देण्याची थाप मारून एकाने जीपीए केला. त्याआधारे परस्पर जमिन वर्ग १ करुन विक्री देखील केली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देऊनही वर्ग १ ची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हतबल झालेल्या गरीब शेतकरी ताराचंद सोनवणे यांनी गुरुवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी सतर्कता दाखवित त्यास ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला.

Sambhajinagar News
Youth Attack Gangapur | गंगापुरात टोळक्याकडून तरुणावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला; सहा जणांवर गुन्हा

सध्या जीपीएचा आधार घेत अनेकजण वर्ग २ ची जमिन वर्ग १ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत. यात बहुतांश प्रकरणांमध्ये बोगस जीपीए असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, असेच एक प्रकरण वाळूजमधील धरमपूर-शरणापूर येथील अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबाला पट्टयाने मंजूर झालेली गायरान दीड एकर जमिनीबाबत घडले आहे. ताराचंद सोनवणे यांच्या नावे असलेली वर्ग २ ची गायरान जमीन वर्ग १ करून देतो म्हणत दोघांनी त्यांच्याकडून जीपीए करून घेतला. अन् एका महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून वर्ग १ ची प्रक्रिया पूर्ण करीत परस्पर जमीन परस्पर विक्री केली.

विशेष म्हणजे वर्ग १ ची प्रक्रिया सुरू असतानाच सोनवणे यांनी जीपीए रद्द करून वर्ग १ ची प्रक्रिया थांबविण्यात यावी, यासाठी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. परंतु, त्यांच्या या अर्जाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. अखेर प्रशासनाकडून कुठलाच न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या सोनवणे यांनी थेट आत्मदहनाचा निर्णय घेतला.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : चिकलठाण्यात भव्य इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना

ते म्हणाले की, गुरुवारी पेट्रोल सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्यासाठी गेलो होतो. परंतु, पोलिसांनी त्यापूर्वीच ताब्यात घेऊन समजूत काढली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन निवेदन स्विकारले. तसेच प्रकरणात तातडीने चौकशी करून खरेदी-विक्री प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

याप्रकरणात दोन दिवसांत चौकशी करून दस्त नोंदणी विभागाला पुढील कारवाईसाठी पत्र पाठविण्यात येईल. खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, आश्वासन निवासी असे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी ताराचंद सोनवणे व त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबीयांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.