Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारची लेखी हमी

महिनाभरात सुधारित जीआर; सरकारकडून कुणाच्याही दबावाला बळी न पडण्याचे आश्वासन
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारची लेखी हमी File photo
Published on
Updated on

Government's Written Assurance for Kunbi Certificates: Manoj Jarange Patil

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची सरकारकडून लेखी हमी मिळाली असून, मंगळवारपासून त्यासंदर्भातील आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकार हे काम पूर्ण करेल आणि महिनाभरात सुधारित जीआर जारी केला जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा उपोषण

मराठा समाजावर अन्याय होईल, असे कोणतेही पाऊल सरकारने उचलू नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असून, सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

उपोषण का सोडले, असे विचारले असता जरांगे म्हणाले, माझ्या समाजबांधवांना माझ्या प्रामाणिकपणावर आणि इमानदारीवर विश्वास आहे. मी कधीही माघार घेतलेली नाही. सातारा संस्थानाबाबतचा जीआर लवकरच निघणार आहे. तसेच हैदराबाद गॅझेटसंदर्भातील सुधारित

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. ७०-८० वर्षे आरक्षण मिळाले नाही, आता एका महिन्यात त्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणाबाबत भूमिका मांडली नाही, याबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकारचा एक घटक म्हणून मी त्यांच्या बाबतीत बोलतो. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले नसेल, तर त्यांनी दुर्लक्ष केले असे म्हणता येईल. कारण ते आता बदलले असतील; मात्र त्यांनी बदलू नये आणि तसा संदेश जनतेमध्ये जाऊ नये. धनंजय देशमुख यांच्यावरील गुन्ह्याबाबत बोलताना त्यांनी संबंधित तक्रार खोटी असल्याचा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news