MP. Supriya Sule : सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

हेक्टरी लाखाची मदत द्या : थकीत हप्ते, कर्जमाफीवरून विचारला जाब
MP. Supriya Sule
MP. Supriya Sule : सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक file photo
Published on: 
Updated on: 

Government cheating farmers: MP. Supriya Sule

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी होरपळत असताना सरकारकडून केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. ही मदतही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यासह नमो कृषी योजनेचे थकीत हप्ते तातडीने वितरित करावेत, अशी मागणी सोमवारी (दि. १९) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

MP. Supriya Sule
Fraud Case : लीगल प्रॉपर्टी सांगून मनपाच्या अतिक्रमणातील भूखंड गळ्यात मारला

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या शहरात आल्या असता सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, अशा वेळी निवडणुकांपेक्षा जनतेला मदत देण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होऊनही त्याचे वितरण रोखले जात असल्याचा आरोप करत सुळे यांनी चारा छावण्या सुरू करण्याबाबत, कर्जमाफी आणि कर्जवसुली थांबविण्याबाबत सरकारला जाब विचारला. नमो कृषी योजनेचे दोन हप्ते अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे कुठे गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे लिहून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका मांडली आहे. मात्र, सरकारकडून निराशाजनक प्रतिसाद मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत समन्वय असून, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. ठाकरे गटाकडून पाठिंब्याची सकारात्मक बातमी लवकरच येईल, अशी अपेक्षाही खा. सुळे यांनी व्यक्त केली.

MP. Supriya Sule
Crime News : पतीसोबत 'रील्स' बनवण्यास विरोध केल्याने घरात घुसून राडा

दरम्यान राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारला लक्ष्य करताना सुळे यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ला आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची चौकशी तातडीने करून त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी आमदाराच्या कुटुंबालाच सुरक्षितता मिळत नसेल, तर सामान्य माणसाने सुरक्षित कसे जगायचे, असा सवाल त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news