Crime News : पतीसोबत 'रील्स' बनवण्यास विरोध केल्याने घरात घुसून राडा

पतीला सोडून दे, म्हणत विवाहितेला धमकावले ; चिकलठाणा परिसरातील घटना
Crime News
Crime News : पतीसोबत 'रील्स' बनवण्यास विरोध केल्याने घरात घुसून राडाfile photo
Published on: 
Updated on: 

Assaulted after breaking into a house for opposing the making of 'Reels' with a husband

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुसऱ्या तरुणीसोबत सोशल मीडियावर 'रील्स' बनवण्यास विरोध करणाऱ्या विवाहितेला संबंधित तरुणीसह तिच्या कुटुंबाने घरात घुसून शिवीगाळ केली. तू तुझ्या पतीसोबत राहायचे नाही, त्याला सोडून दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत विवाहितेच्या अंगावरील १ लाख २० हजारांचे मंगळसूत्र आणि अंगठी हिसकावून नेली.

Crime News
Sambhajinagar News : सातारातील नागरिकांना लवकरच होणार पाणीपुरवठा

हा प्रकार बुधवारी (दि.१४) चिकलठाणा परिसरातील बजरंगनगर येथे घडला. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणी, तिची आई, भाऊ, वडील (सर्व रा. चिकलठाणा) आणि एक अनोळखी यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंगनगर भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहितेचा विवाह ३० मार्च २०२६ रोजी झाला होता. तिचा पती हा सोशल मीडियावर नियमित रील्स बनवत असे. त्यादरम्यान त्याची ओळख म्हाडा कॉलनीतील २२ वर्षीय तरुणीशी झाली व ते दोघे सोबत रील्स बनवू लागले. मात्र, पतीने तिच्यासोबत रील्स बनवू नये, असा आक्षेप पत्नीने घेतला.

पत्नीच्या सांगण्यावरून पतीने रील्स बनवणे बंद केल्यानंतर पती आणि त्या तरुणीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या वादातून त्या तरुणीने यापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. बुधवारी (दि. १४) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विवाहिता तिचा दीर असे घरात होते. त्यावेळी पती घरात नव्हता. हीच संधी साधून आरोपी घरात घुसले. त्यांनी विवाहितेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

Crime News
Jaltara : जिल्ह्यात प्रत्येक गावात जलताराची १०० कामे

तू तुझ्या पतीसोबत राहायचे नाही, त्याला सोडून दे; नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत ७ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ४ ग्रॅमची अंगठी बळजबरीने हिसकावून घेतली आणि आरोपी दुचाकींवरून पसार झाले. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक दशरथ जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news