Crime News : मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली

शहरात साखळीचोरांचा सुळसुळाट पुन्हा एकदा वाढला आहे.
Gold chain snatched
Crime News : मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावलीfile photo
Published on
Updated on

Gold chain weighing two-and-a-half tolas snatched from elderly woman during morning walk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात साखळीचोरांचा सुळसुळाट पुन्हा एकदा वाढला असून, सिडकोत मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला दुचाकीस्वार लुटारूंनी लक्ष्य करत गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.५) सकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास गुरुकृपा फरसाण मार्ट समोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gold chain snatched
Maratha Reservation : पत्रपरिषदेतूनच जरांगेंचा उदय सामंत यांना फोन

फिर्यादी शोभा पुनमचंद तोतला (६५, रा. आविष्कार कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, शोभा या नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी पावणेसात ते सात वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक आटोपून घरी परतत होत्या. त्या सिडको एन-६ परिसरातील गुरुकृपा फरसाण मार्टसमोरील रस्त्यावरून पायी जात होत्या. रस्ता मोकळा असताना अचानक त्यांच्या समोरून एका दुचाकीवर दोन तरुण आले.

या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने पिवळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. काही कळायच्या आतच या पिवळे जॅकेट घातलेल्या तरुणाने चालत्या गाडीवरून तोतला यांच्या जवळ येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि पेंडंट बळजबरीने हिसकावले. आरडाओरड करेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून सुसाट पळ काढला.

Gold chain snatched
Shivbhojan Thali : जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचे पैसे थकले

या भयानक प्रकारामुळे शोभा तोतला यांना मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यांची प्रकृती बिघडली. या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी सिडको ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news