Sanitation issue : घाटनांद्रात घाणीचे सामाज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

25 हजार लोकसंख्येच्या गावाला रोगराईची भीती; प्रशासनाचे दुर्लक्ष
sanitation issue
गावात ठिकठिकाणी सांडपाण्याच्या नाल्याही तुंबलेले आहेत. (छाया : गणेश )
Published on
Updated on

घाटनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटनांद्रा गावामध्ये सध्या स्वच्छतेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अंदाजे 25 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे परिसरात सर्वत्र असह्य दुर्गंधी पसरली असून ग््राामस्थांमध्ये रोगराई उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे घाटनांद्रा गावाला यापूर्वी हागणदारी मुक्त गाव म्हणून प्रसिद्धीपत्र मिळाले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत एकेकाळी आदर्श मानल्या गेलेल्या या गावाची आज जी अवस्था झाली आहे, ती पाहून ग््राामस्थांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे. हागणदारी मुक्त गावाचा लौकिक मिळवलेल्या गावात आज सर्वत्र कचरा आणि घाण साचली असणे, हा मोठा विरोधाभास असल्याचे ग््राामस्थ सांगतात.

sanitation issue
Jalgaon news | शेतकऱ्यांच्या घामाचे 'मोती' आगीत खाक; महावितरणच्या ठिणगीने 'सोनं' झालं कोळसा

घंटागाडी बंद, कचरा रस्त्यावर

मागील पाच वर्षांपूर्वी ग््राामपंचायतीने कचरा संकलनासाठी घंटागाडी सेवा सुरू केली होती. मात्र कचरा टाकण्यासाठी गावाजवळ कचरा डेपोच उपलब्ध नसल्याने ही घंटागाडी सेवा सध्या पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे गावातील कचरा उचलला जात नसून मुख्य रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचत चालले आहेत. भूमिगत गटार अपूर्ण, तसेच नियमित साफसफाई व देखभाल होत नसल्याने काही ठिकाणी हे गटार ब्लॉक झाले आहेत. यामुळे गावातील गटारगंगा कायम आहे.

sanitation issue
Sangli news: रिळे येथे गवताच्या गंजीला आग

रोगराईची भीती

सध्या पावसाळा अगदी तोंडावर आला असून गावातील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. नाल्यांमधून सर्वत्र दुर्गंधी येत असून परिसरात डासांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नाल्यांमधील घाण वेळीच काढली नाही तर पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती ग््राामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, या समस्येविषयी ग््राामपंचायत अधिकारी रामराव धुड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही कचरा डेपोसाठी गट क्रमांक 885 व 478 या गटाचा शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, त्याला मंजुरी मिळाली आहे. आता भूमी अभिलेख विभागाकडून कुठलीच ठोस करवाई करण्यात येत नसल्याने कचराडोपेचा प्रश्न प्रलंबीत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news